Thursday, December 7, 2023
घरमानिनीKitchenRecipe : मैसूर मसाला उत्तपा रेसिपी

Recipe : मैसूर मसाला उत्तपा रेसिपी

Subscribe

सकाळच्या नाश्त्यामध्ये ,मैसूर उत्तपा बनवायला अगदी सोप्पा आहे. मैसूर उत्तपा सकाळच्या नाश्तासाठी बेस्ट ऑप्शन आहे. मैसूर उत्तपा बनवायला लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया…

साहित्य

  • 2 कप तयार डोश्याचं पीठ
  • 2 उकडलेले बटाटे
  • 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • 4-5 कढीपत्ता
  • 1 टीस्पून जीरे
  • 1 टीस्पून मोहरी
  • 5-6 लसूण पाकळ्या
  • 1 टीस्पून जीरे पावडर
  • कोथिंबीर
  • 1 टीस्पून हळद
  • 2 बारीक चिरलेले कांदे
  • 1/4 कप किसलेले बीट

नारळाच्या चटणीसाठी साहित्य

  • 1 कप किसलेले ओले खोबरे
  • 4-5 हिरवी मिरची
  • 2 टेबलस्पून पंढरपूरी डाळ
  • मीठ चवीनुसार
  • अर्धा आल्याचा तुकडा

220+ Uttapam Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock | Poha uttapam, Oats uttapam

कृती

  • सर्वप्रथम नारळाची चटणी करण्यासाठी, मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे,मिरची,आलं,डाळ्या,मीठ घालून पाणी घालून चटणी वाटून घ्या.
  • यानंतर उत्तपासाठी बटाट्याची भाजी करता पॅनमध्ये तेल, कडिपत्ता,जीरे,मोहरी,हिंग मिरच्या फोडणी करून त्यात कांदा घालून परतून घ्या.
  • हे झाल्यावर त्यात हळद,बटाटे घालून स्मॅश करून घ्या. मग मीठ घालून २ मि.भाजी परतून घ्या. त्यात कोथिंबीर घाला.
  • मसाला उत्तपमसाठी,डोसा तवा गरम करून तेलाने ग्रीस करा.
  • उत्तपा करताना तव्यावर हलके पाणी शिंपडून डोश्यापेक्षा थोडा जाडसर उत्तपा करून घ्या.
  • आता बटाटा भाजी,चिली गार्लिक चटणी,कांदा,किसलेले बीट, कोथिंबीर,मीठ,थोडं‌ लाल तिखट घालून मिश्रण उत्तप्यावर छान पसरून घ्या.
  • दोन्ही बाजूने उत्तपा खरपूस छान भाजून घ्या. त्यामुळे उत्तपा कुरकुरीत होईल आणि चवीला चविष्ट लागेल.

हेही वाचा : Recipe : मिक्स डाळीचे कुरकुरीत अप्पे

- Advertisment -

Manini