आपण हॉटेलमध्ये किंवा मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डोसा खातो. तसेच हे डोसे आपण घरी सुद्धा ट्राय करून बघतो. अशातच आता आपण पापडापासून कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे पाहणारा आहोत. तसेच आता आपण पापड डोसा कसा करायचा हे जाणून घेऊया… या डोसाला लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे…
साहित्य
- 5-6 पापड
- 1 ग्लास पाणी
- मीठ चवीनुसार
- बटाटा भाजी (सारणासाठी)
कृती
- सर्वप्रथम 5-6 पापड एकत्र घ्या.
- आता एक भांड्यात 1 ग्लास पाणी घ्या.
- पापडाचे तुकडे या पाण्यात चांगले मिक्स करून घ्या.
- मग ते नरम होतील,हे झाल्यावर त्यातील पाणी सगळे काढून घ्या.
- आता हे नरम झालेले पापड मिक्सरला लावा.
- याची एक मऊ पेस्ट होईल.
- या पेस्टला डोसा सारखे एका पॅनवर छानपैकी पसरून घ्या.
- हे करत असताना जर का तुम्हाला बटाटाच्या भाजीचे सारण हवे असेल तर त्या डोसावर टाकून घ्या.
- आता तयार आहे तुमचा पापडा पासून बनवलेला गरमा-गरम डोसा.
- पापड डोसाला तुम्ही सॉस किंवा कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता.
हेही वाचा : Papad Chutney Recipe: कुरकुरीत पापड चटणी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -