Sunday, February 25, 2024
घरमानिनीKitchenRanbhaji Recipe : रानभाज्यांची रेसिपी

Ranbhaji Recipe : रानभाज्यांची रेसिपी

Subscribe

करटोली

करटोली ही रानभाजी असून यात अनेक औषधी गुण आहेत. डोकेदुखी, पित्त याबरोबरच बद्धकोष्ठावरही करटोली गुणकरी आहे. यात सर्दी , खोकला,तापासह अनेक आजारांवर आवश्यक असलेले ॲण्टीऑक्सिडंट्सही आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीही करटोली उपयुक्त आहे.

- Advertisement -

साहीत्य- सहा सात मोठे करटोली, दोन चमचे तेल, चिमूटभर मोहरी, हिंग, पाव चमचा हळद,जिरे,चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, दोन चमचे बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ.

कृती- सर्वप्रथम करटोली कापून घ्या. त्यातील बिया, गर काढून टाका. नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल टाकून तेलावर जिरे, मोहरी, हिंग टाका.नंतर हळद, कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्या. कांदा लालसर झाला की त्यात कापलेले करटोली टाकून परतून घ्या. मीठ टाका. कढईवर झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजवा. गरज वाटल्यास भाजीत किसलेले खोबरंही घालू शकता. गरम पोळीबरोबर करटोलीची भाजी अप्रतिम लागते.

- Advertisement -

जाणून घ्या कंटोळीचे (कर्टुल) शरीरासाठी लाभदायी औषधी गुण | health-benefits-of-eating-kantola-or-spiny-gourd-in-hindi

कुरडूची भाजी

पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यांमध्ये कुरडू या पालेभाजीचा समावेश होतो. कुरडू हे एक प्रकारचे तण असते.यातही अनेक औषधी गुण आहेत.

साहीत्य-दोन जुड्या कुरडूची भाजी, दोन चमचे तेल, लसूण,दोन कांदे, पाच हिरव्या मिरच्या, एक चमचा हिंग, हळद, एक टो़मेटो, पाव वाटी किसलेले ओलं खोबरं, किंवा भिजवलेली मूगाची डाळ टाकावी. चवीनुसार मीठ.

कृती-सर्वप्रथम कढईत तेल गरम करून घ्या. त्यात हिंग, लसूण ,जिरे-मोहरी टाकावी. नंतर त्यात कांदा,मिरची,टोमटो टाकून परतून घ्यावी. नंतर त्यात चिरलेली
कुरडूची भाजी टाकावी. मीठ टाकून भाजी परतून घ्यावी. त्यात खोबर किंवा मूग डाळ टाकावी.

पावसाळ्यातील रान भाजी कुरडू ची भाजी | Mansoon Special Ranbhaji Kurdu Chi Bhaji Recipe In Marathi - YouTube

शेवळीची भाजी

पावसाळ्यात मिळणारी शेवळी ही रानभाजी आहे.ह्या भाजीत औषधी गुण असल्याने ही भाजी नक्की खावी.

साहित्य: पाच सहा शेवळीच्या कांड्या, दोन मध्यम आकाराचे कांदे,चवीपुरता गूळ, पाव वाटी सुके खोबरं किस, पाच लसूण पाकळ्या, एक चमचा धने, एक चमचा जिरं, दोन लवंगा,चवीनुसार लाल तिखट,हळद, गरम मसाला, मीठ, चिंच,

कृती- शेवळीचे पान काढून घ्या. नंतर आतली कांड्या वेगळ्या करा.त्याचा पिवळा भाग फेकून द्या. बाकीचा उरलेला भाग कापून घ्या. पानं धुऊन चिरुन घ्या. नंतर कांड्या आणि चिरेलेली पान चिंच टाकलेल्या गरम पाण्यात १५ मिनिट शिजवा. त्यातनंतर भाजी गाळून घ्या. उरलेले पाणी फेकून द्या.नंतर कुकरमध्ये तेल टाकून त्यात लसूण, हिंग, जिरे मोहरी, धने, हळद, लाल तिखट, टाकून परता. नंतर त्यात शिजवलेली भाजी मीठ टाकून परता. आवश्यकतेनुसार त्यात पाणी टाका. दोन शिट्या घ्या. तांदळाच्या भाकरीबरोबर शेवळीची भाजी सर्व करा.

शेवळाची भाजी | Shevalachi Bhaji | Dragon Stalk Yam recipe | Authentic Maharashtrian Recipe - YouTube

________________________________________________________________________

हेही वाचा : 

Corn Recipes : नाश्त्यासाठी बनवा हेल्दी कॉर्न उपमा

 

 

 

 

 

- Advertisment -

Manini