उपवासाला फळे, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा वडा, रताळ्याचा किस वगैरे विशिष्ट पदार्थच तयार करत असतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला खास उपवासासाठी शिंगाड्याच्या पिठाचा खमंग शिरा कसा बनवायचा हे दाखवणार आहोत.
साहित्य :
- 1 वाटी शिंगाड्याचे पीठ
- 2 चमचा तूप
- 2 चमचा साखर
- 1 ग्लास गरम पाणी
- मिक्स ड्रायफ्रुट पावडर (आवश्यकते नुसार)
कृती :
- सर्वप्रथम गरम कढईत 2 चमचे तूप घालून त्यात शिंगाड्याचे पीठ छान परतून घ्या.
- पीठ खमंग भाजल्यानंतर त्यात गरम पाणी घालून ते परतून घ्या.
- 1-2 मिनिट परतल्यानंतर त्यात 2 चमचे साखर घाला.
- आता त्यात ड्रायफ्रुट पावडर घाला.
- हे सर्व मिश्रण 3-4 मिनिट परतल्यानंतर गॅस बंद करा.
- गरमा-गरम शिंगाड्याच्या पीठाचा शिरा सर्व्ह करा.
- Advertisement -
हेही वाचा :
Maggi Masala Recipes : घरच्या घरी बनवा मॅगी मसाला
- Advertisement -
- Advertisement -