Friday, April 19, 2024
घरमानिनीKitchenVangyache Bharit Recipes : अस्सल मालवणी पद्धतीचे वांग्याचे भरीत नक्की ट्राय करा...

Vangyache Bharit Recipes : अस्सल मालवणी पद्धतीचे वांग्याचे भरीत नक्की ट्राय करा…

Subscribe

वांग म्हंटलं कि बहुतेक जण हे नाक मुरडतात. पण सर्रास लोकांना चमचमीत वांग्याचे भरीत खायला सगळ्यांना आवडते. गावी गेल्यावर भाकरी,चपाती सोबत हे वांग्याचे भरीत एकदम झक्कास लागत. सगळीकडे याची रेसिपी वेगवेगळ्या स्टाईलने करत असतात. अशातच आता अस्सल मालवणी पद्धतीचे वांग्याचे भरीत नक्की ट्राय करा…जाणून घ्या साहित्य आणि कृती…

Vangyache Bharit | वांग्याचे तवा भरीत | Baingan ka Bharta | Tawa Bharit - YouTube

- Advertisement -

साहित्य-

  • 1 मोठे वांगे
  • 2 मध्यम कांदे, बारीक चिरलेले
  • 1 मोठा टोमॅटो, बारीक चिरलेला
  • 2 टेस्पून तेल,
  • 2 चिमटी मोहोरी,
  • 1/4 टीस्पून हिंग,
  • 1/4 टीस्पून हळद,
  • 1/4 टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या,
  • 3 ते 4 मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
  • चवीपुरते मीठ
  • चिरलेली कोथिंबीर (सजावटीसाठी)

Try This Unique Baingan Bharta From Maharahtra's Khandesh Region

- Advertisement -

कृती-

  • सर्वात प्रथम वांगे चांगले भाजून घ्यावे.
  • यानंतर वांगे गार होवू द्यावे. वांगे सोलून आतील गर बाजूला काढावा आणि सुरीने रफली चिरावे.
  • हे झाल्यावर कढईत तेल गरम करावे. यामध्ये मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात
  • चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतावे.
  • यासोबतच कांदा घालून छान परतत राहावे. आता कांदा छान परतला गेला कि टोमॅटो घालून एकदम मऊ होईस्तोवर परतावे.
  • यानंतर यात मीठ आणि सोललेले वांगे घालून व्यवस्थित मिक्स करावे.
  • तळापासून परतावे म्हणजे तळाला वांगे चिकटून जाळणार नाही.
  • तसेच वांग्याच्या कडेने तेल सुटेस्तोवर परत राहावे (साधारण ५ ते ८ मिनिटे)
  • गरम भरीत भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.

हेही वाचा : Rava Nuggets Recipe : नाश्त्याला बनवा कुरकूरीत रव्याचे नगेट्स

- Advertisment -

Manini