श्रावणात भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशातच यंदाच्या श्रावणात मिक्स भाज्यांचे व्हेजिटेबल लॉलीपॉप घरी एकदा करून बघाच. तसेच मिक्स व्हेजिटेबल लॉलीपॉप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता आपण जाणून घेऊया व्हेजिटेबल लॉलीपॉप कसे बनवायचे. जाणून घ्या व्हेजिटेबल लॉलीपॉपसाठी लागणारे साहित्य कृती…
साहित्य
- 5/6 बेबी कॉर्नस
- तेल
- आल्याची पेस्ट
- हिरवी मिरची
- गाजर
- मटार
- उकडलेले बटाटे
- सुरण किंवा रताळं
- लाल तिखट
- चवीनुसार मीठ
- कोथिंबीर
- चाट मसाला
- गरम मसाला
कृती
- आलं बारीक कापून घ्यावं. आता त्यात हिरवी मिरची थोडंसं मीठ घालून वाटून घ्या.
- यानंतर गाजर किसून घ्यावं. हे झाल्यावर मटार दाणे मिक्सरमधून काढावे.
- आता फ्राय पॅनमध्ये तेल घालून आल्याचे तुकडे, मिरची पेस्ट, गाजराचा किस, मटार पेस्ट, उकडलेले बटाटे कुस्करून, उकडलेला सुरण किंवा रताळं कुस्करून, थोडं मीठ, हे सर्व घालून परतावं.
- नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम मसाला, तिखट, चाट मसाला घालून मिसळून त्याचा गोळा करून घ्यावा.
- बेबी कॉर्नचे प्रत्येकी दोन उभे काप करावे.
- यानंतर प्रत्येक कापाच्या एका टोकावर वरील मिश्रणाचा बेस त्याला लावावा.
- त्यावर थोडेसे कॉर्न स्टार्च घालावे. नंतर तेलात तळावे.
- हे लॉलीपॉप मुलं आवडीनं खातात. तसेच हे शरीरासाठी पौष्टिकही आहे.
हेही वाचा :
Shravan Recipe : श्रावणात ट्राय करा पुरणाची करंजी
- Advertisement -
- Advertisement -