रोजच्या नाश्त्यासाठी बनवायचे काय असा प्रश्न सर्व महिलांना पडतो. अशावेळी घरी बनवा कुरकुरीत पोह्यांचा चिवडा. हा पोह्यांचा चिवडा लागतो पण छान आणि शरीराला सुद्धा हेल्दी आहे.
साहित्य
- पाव किलो पातळ पोहे.
- 100 ग्रॅम शेंगदाणे.
- 50 ग्रॅम फुटाण्याचं डाळं.
- 200 ग्रॅम सुकं खोबरे.
- तेल.
- मीठ- चवीनुसार
- पिठी साखर (प्रमाणानुसार)
- फोडणीचं साहित्य– कढीपत्ता, थोडेसे काजू, हिरव्या मिरच्या, धने पूड, जिरे पूड.
कृती
- कढईत थोडंसं तेल घालून ते तापलं की त्यात पोहे घालून चांगले तांबूस होईपर्यंत भाजावे.
- नंतर हे पोहे एक ताटात ओतावे.
- आता कढईत तेल घालून ते तापलं की त्यात शेंगदाणे टाकावे आणि ते चांगले तळून पोह्यावर घालावे.
- हे झाल्यावर कढईतल्या तेलात फोडणी द्यावी.
- यानंतर गॅस बंद करून कढीपत्त्याची पानं फोडणीत घालावी व हिरव्या मिरच्यांचे अगदी पातळ तुकडे त्यात घालावे.
- नंतर काजू घालून हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे.
- आता कढई खाली उतरून यात मीठ, पिठी साखर, डाळं, थोडीशी धनेपूड आणि जिरे पूड टाकून कढईत परतावे.
- तसेच आवडत असल्यास सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तेलावर भाजून टाकावे.
- सगळ्यात शेवटी हा चिवडा कढईत पुन्हा खरपूस भाजून घ्यावा.