Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen Mango Jam Recipe : घरच्या घरी बनवा आंब्याचा जाम

Mango Jam Recipe : घरच्या घरी बनवा आंब्याचा जाम

Subscribe

लहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे फ्रुट जाम. उन्हाळा आला की बाजारात कच्च्यापासून पिकापर्यंत अनेक प्रकारचे आंबे पाहायला मिळतात. या ऋतूत लहान मुले भरपूर कच्चे-पिकलेले आंबे आणि आईस्क्रीम खातात. तसेच घरोघरी आंब्याची पावडर, मुरंबा, लोणचे, जाम असे अनेक पदार्थ बनवून महिला वर्षभर आंब्याच्या पदार्थांची साठवणूक करतात. चला तर मग आता आपण जाणून घेऊया आंब्याचा जामची रेसिपी.

Easy Mango Jam Recipe and Tips for Making Homemade Jams

- Advertisement -

साहित्य-

  • तूप – २ चमचे
  • साखर 2 किलो
  • आंबा बारीक किसलेला – 1.5 किलो
  • वेलची
  • केशर

3 ingredient Mango Jam Recipe | Homemade Mango Jam | Yummy - YouTube

- Advertisement -

कृती-

  • सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून पुसून घ्या. आता आंबा नीट सोलून किसून घ्या.
  • आता तो पाण्यात चांगले धुवा म्हणजे त्याचा आंबटपणाही निघून जाईल.
  • आंबे धुतल्यानंतर त्यातले पाणी काढून टाका.
  • यानंतर एका मोठ्या पातेल्यात ३-४ चमचे तूप टाका आणि गरम होऊ द्या.
  • तूप गरम झाल्यावर त्यात किसलेला आंबा टाकून तळून घ्या.
  • आंबा चांगला भाजल्यावर आणि हलका सोनेरी रंगाचा झाल्यावर त्यात साखर घालून शिजू द्या.

CERTO Mango Jam - My Food and Family

  • साखर आणि आंबा शिजवल्यानंतर साखरेचा पाक घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • साखरेचा पाक आणि आंब्याचा जाम शिजवताना त्यात वेलची आणि केशर टाका.
  • हे झाल्यावर त्याला चांगले शिजवा आणि पॅनमध्ये थंड होऊ द्या.
  • आता आंब्याचा जाम खाण्यास तयार आहे.
  • तुम्हाला थंड जाम हवा असल्यास पॅक बंद डब्यात त्याला फ्रिज करा.

हेही वाचा : सफेद आंबा तुम्ही कधी खाल्लाय का? जाणून घ्या खासियत

- Advertisment -

Manini