मेथीची भाजी बहुतेक लोकांना आवडत नाही. पण तुम्हाला भाजी खायची नसेल तर तुम्ही खरपूस असे मेथीचे कटलेट आवडीने खाल. लहान मुलांना देखील तुम्ही असे कटलेट्स देऊ शकता. यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. जे लहान मुलांसाठी फायदेशीर आहे. मेथीच्या कटलेटसाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे…
साहित्य
- 1 मेथीची जुडी
- 2-3 बटाटे
- 1 टिस्पून हळद
- 2 टिस्पून तिखट
- मीठ- चवीनुसार
- 100 ग्रॅम बाजरीचे पीठ
- तांदूळ किंवा भाजणीचं पीठ (प्रमाणानुसार) तसेच ( ही तीनही पीठं एकत्र)
- तेल
कृती
- सर्वातप्रथम मेथी निवडून, धुवून, बारीक चिरून घ्यावी.
- हे झाल्यावर चिरलेल्या मेथीवर उकडलेले बटाटे साल काढून किसून घ्यावे.
- त्यात पीठ मिक्स करावं. आणि मग त्यात तिखट, हळद व तेल घालावं आणि सर्व मिक्स करून घ्यावं.
- यानंतर त्यात थोडं पाणी घालून मळून घ्यावं.
- दोन्ही हातांना थोडंसं तेल लावून आपल्या आवडीच्या आकाराचे (गोल, लांबट गोल, बदाम वगैरे) कटलेट थापावे.
- हे झाल्यावर फ्रायपॅनमध्ये तेल घालून हे कटलेट चांगले खमंग परतावे. उलटून पुन्हा परतावे.
- कटलेट थापून झाल्यावर त्यावर थोडा बारीक रवा लावला तर कटलेट खूपच छान होते.