Saturday, December 2, 2023
घरमानिनीKitchenRecipe : गाजराचं पौष्टिक लोणचं

Recipe : गाजराचं पौष्टिक लोणचं

Subscribe

बदलत्या वातावरणानुसार आपण घरी लोणची बनवतो. तसेच काही ठराविक लोणची आहेत जी आपण नेहमीच बनवतो. पण तुम्ही गाजराचे लोणचे खाल्ले नसेल तर आता नक्की खाऊन बघा. गाजर हे पौष्टीक असून याचे लोणचे सुद्धा आरोग्यसाठी हेल्दी आहे. जाणून घेऊया गाजराचं पौष्टिक लोणचं कसे बनवायचे तसेच याला लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे…

साहित्य

  • 7-8 गाजर
  • पाव किलो गूळ
  • 4 जरदाळू
  • 3-4 काळा मनुका
  • 5 खारीक
  • 3 चमचे तिखट
  • मोहरी पावडर
  • मीठ (चवीनुसार)
  • आल्याचा छोटा तुकडा
  • अर्धा वाटी व्हिनेगर (प्रमाणानुसार)

Instant Carrot Pickle Recipe by Archana's Kitchen

कृती

  • सर्वप्रथम गाजरं किसून घ्यावी.
  • यानंतर खारीक धुवून, पुसून त्याचे तुकडे करून घ्यावे. यासोबतच जरदाळू धुवून त्याचे तुकडे करून घ्यावे.
  • हे झाल्यावर मनुका धुवून पुसून घ्याव्या. आल्याचे छोटे लांबट तुकडे करावे.
  • आता एका मोठ्या पातेल्यात व्हिनेगर व मोहरी पावडर घालून रवीने चांगलं घुसळावं.
  • त्यात तिखट, मीठ व गूळ घालून गॅसवर ठेवावं. गूळ विरघळल्यावर गाजर कीस, खारीक तुकडे, जरदाळूचे तुकडे, मनुका व आल्याचे तुकडे घालावे.
  • यात पाणी अजिबात घालू नये व झाकण ठेवू नये.
  • हे करत असताना मधून मधून हे मिश्रण हलवत राहावं.
  • आता मिश्रण घट्ट झालं की ते पूर्ण गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावं.

हेही वाचा : Recipe: पौष्टिक बाजरीची खिचडी

- Advertisment -

Manini