गणपती बाप्पाला निरोप देताना घरी गोडाचा प्रसाद दाखवला जातो. तसेच यंदा सुद्धा बाप्पासाठी घरी बेसनच्या खोबरं वड्या नक्की बनवा. बेसन आणि खोबरे यांचे मिश्रण चवीला खूप छान लागते आणि त्याच्या वड्या देखील खूप छान रुचकर लागतात. जाणून घ्या बेसन आणि खोबरं वड्या याला लागणारे साहित्य आणि कृती…
साहित्य
- 1वाटी बेसन पीठ.
- 1 वाटी ओल्या नारळाचा किस.
- 1 वाटी दूध.
- 1 वाटी तूप.
- 3 वाट्या साखर.
कृती
- सर्वप्रथम बेसन पीठ, ओल्या नारळाचा किस,दूध, तूप व साखर हे सगळं एकत्र करावं.
- आता स्वच्छ पातेल्यात दूध गॅसवर ठेवून हलवत राहावं.
- थोड्या वेळाने दूध घट्ट होत आलं की उपड्या ताटाला थोडं तूप लावून त्यावर दूध ओतावे.
- यानंतर दूध जरा गार झालं की त्यावर तुम्हाला हव्या तश्या आकारात वड्या पाडाव्या.