Wednesday, October 4, 2023
घर मानिनी Kitchen पिठोरीला बनवा गूळ पापडीच्या वड्या

पिठोरीला बनवा गूळ पापडीच्या वड्या

Subscribe

पिठोरी अमावस्येच्या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. तसेच तुम्ही सुद्धा या दिवशी घरी अगदी सोप्या पद्धतीने गूळ पापडीच्या वड्या करू शकता आणि हा नैवेद्य घरी देवाला अर्पण करू शकता. गूळ पापडीच्या वड्या बनवण्यासाठी जाणून घ्या साहित्य आणि कृती…

साहित्य

 • 4 वाट्या कणीक.
 • तीन वाट्या गूळ.
 • वेलदोडे पूड.
 • साजूक तूप.

Gud papdi Recipe by Harshita Arora - Cookpad

कृती

 • 1 वाटी तूप कढईत घालावे.
 • तूप चांगले तापले की ४ वाट्या कणीक घालावे.
 • कणीक खमंग भाजून घ्यावे.
 • कणिक भाजल्यावर गुळाचा थोडं पाणी घालून पाक करावा.
 • त्यात वेलदोड्याची पूड टाकावी.
 • त्यात भाजलेली कणीक टाकावी.
 • उपड्या थाळीला तूप लावून घ्यावे. त्यावर हे मिश्रण ओतावे.
 • एका वाटीच्या तळाला बाहेरून तूप लावून त्या वाटीने हे मिश्रण थापून एकसारखे करावे.
 • या मिश्रणावर आवडत असल्यास वरून सुक्या खोबऱ्याचा किस भुरभुरून थापावा.
 • नंतर सुरीने हव्या त्या आकारात वड्या पाडाव्या.
 • तयार आहे गोड गूळ पापडी.
- Advertisement -

________________________________________________________________________

हेही वाचा : Milk Barfi : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा दूधाची बर्फी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini