Thursday, April 25, 2024
घरमानिनीKitchenPrawns Rice Recipe : झणझणीत कोळंबी भात नक्की ट्राय करा

Prawns Rice Recipe : झणझणीत कोळंबी भात नक्की ट्राय करा

Subscribe

फिश डिश मधली कोळंबी डिश ही सगळ्यांची आवडती डिश आहे. कोळंबी हा मासा छोटासा पण भन्नाट टेस्टी लागतो. कोळंबी हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. तसेच हा कोळंबी भात पटकन होणारा एक चविष्ट पदार्थ आहे. आपल्या महाराष्ट्रात कोळंबी भात हा पदार्थ आपल्याकडे सर्वात जास्त लोकप्रिय आहे. अशातच मासे खाणाऱ्या लोकांसमोर कोळंबी भात असे नुसते म्हटले तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. तर आता आपण जाणून घेऊया झणझणीत कोळंबी भाताची पटकन होणारी रेसिपी…

Prawn Biryani Mangalorean Style

- Advertisement -

साहित्य-

  • 2 वाट्या तांदूळ
  • 4 मोठे कांदे
  • 3 लहान टोमॅटो
  • 1 वाटी कोळंबी (साफ केलेली)
  • 1 मोठा चमचा आलं-लसूण वाटण
  • 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला
  • 3 मोठे चमचे लाल तिखट (आगरी-कोळी मसाला)
  • 4 लाल मिरच्या
  • 5 लवंग
  • 1 इंच दालचिनी
  • 2 वेलची (वाटून घेतलेल्या)
  • 1 चमचा जिरे
  • 2 तेजपत्ता
  • अर्धा वाटी तेल
  • मीठ चवीनुसार

Chemmeen Biriyani / Kerala Prawns/ Shrimp Biryani Recipe

- Advertisement -

कृती-

  • तांदूळ चांगले धुऊन त्यात तेजपत्ता टाकून भात शिजवून सुटा करा.
  • कढईत तेल तापवून जिरं, आलं-लसूण, परता. त्यानंतर त्यामध्ये कांदे, टोमॅटो टाकून परता.
  • सर्व मसाले, वाटण त्यामध्ये टाका आणि पुढे कोळंबी टाकून एक वाफ आणा.
  • हे करत असताना चवीनुसार मीठ टाकायला विसरु नका.
  • नंतर त्या मिश्रणामध्ये भात, कोथिंबीर टाकून चांगले एकत्र करा व एक वाफ आणा.
  • आता कोळंबी भात सर्व्ह करण्यास तयार आहे.

हेही वाचा : cashew vegetable recipe : हॉटेल स्टाईलमध्ये करा काजूची भाजी

- Advertisment -

Manini