आपण बऱ्याचदा भोपळ्याची भाजी तर खातोच. मात्र भोपळ्याची भाजी करताना आपण त्याची साल काढून टाकतो. डॉक्टरांच्या, मते भोपळ्याच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. आता आपण जाणून घेऊया भोपळ्याच्या सालीपासून झटपट चटणी कशी बनवता येईल.
साहित्य-
- एक वाटी दुधी भोपळ्याचा जाडसर कीस
- 2 चमचे तेल
- अर्धा चमचा मोहरी / अर्धा चमचा जिरे
- चिमूटभर हिंग
- 2 चमचे शेंगदाणा कूट
- अर्धा चमचा लाल मिरची पावडर
- अर्धा चमचा हळद
- मीठ (चवीनुसार)

कृती-
- प्रथम भोपळा स्वच्छ धुवून घ्या.
- हलक्या हाताने किसणीवर जाडसर कीस किसून घ्या.
- यात फक्त भोपळ्याचे सालच किसावे.
- आता मंद गॅसवर एका भांड्यात दोन चमचे तेल गरम करावं.
- त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद वर सांगितल्याप्रमाणे टाकावं.
- नंतर त्यात सालीचा कीस टाकावा.
- हे मिश्रण परतून घ्यावं आणि लगेच शेंगदाणा कूट, साखर व मीठ चवीनुसार टाकून तांबूस रंग व कुरकुरीत होईपर्यंत भाजावं.
- लगेच वाटीत किंवा लहान ताटलीत कीस काढावा.
- अशाप्रकारे तयार झाली दुधी भोपळ्याच्या सालीची कुरकुरीत चटणी.
- Advertisement -
- Advertisement -