Thursday, February 29, 2024
घरमानिनीKitchenपीठात टाका ही गोष्ट, पोळ्या होतील लुसलुशीत

पीठात टाका ही गोष्ट, पोळ्या होतील लुसलुशीत

Subscribe

पोळी ही घराघरात बनतच असते. पोळी हा दररोजच्या जेवणातला सर्वात महत्वाचा पदार्थ. ताटात पोळी नसेल तर जेवण अपूर्ण वाटते. अनेक घरात घाईच्या वेळेत सकाळच्या नाश्त्यासाठी गरम पोळी खाल्ली जाते. पण, ही पोळी कधी वातट होते तर कधी कडक. पोळीचे पीठ मळताना जास्त तेल घातले तर पोळी चांगली होते असा अनेकांचा समाज असतो. पण दरवेळेला हे घडेलच असं नाही. तुमची हीच समस्या लक्षात घेऊन आम्ही आज काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.

पिठात दही घातल्यास काय होईल ?

- Advertisement -

दही हे प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम समृद्ध दुग्धजन्य पदार्थ आहे. दह्याचा आंबट गुणामुळे पीठ मऊ होण्यास आणि ग्लूटेन अधिक विकसित होण्यास मदत होते. याने मऊ पोळ्या तयार होतात. त्यामुळे पीठ मळताना तुम्ही त्यात दही घालू शकता.

- Advertisement -

पीठ कसे तयार कराल –

दीड कप गव्हाचे पीठ
२ चमचे साधे दही
आवशक्यतेनुसार पाणी
चवीनुसार मीठ

पीठ बनवण्याची पद्धत –

घटक मोजून घ्या – दीड कप गव्हाचे पिठात २ चमचे दही मिसळा. दह्याने पाणी कमी लागते. पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की, पीठ जास्त पातळ करायचे नाही.

थंड दही घालू नका – पीठ मळताना थंड दही मिक्स करू नका. दही रूम टेम्परेचरवर आणूनच ते वापरावे.

मऊ पीठ मळून घ्या – गव्हाच्या पिठात दही मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालावे. यानंतर मिश्रणात हळूहळू पाणी घाला.

पीठ झाकून ठेवा – पीठ मळून झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. तसेच तुम्ही मळलेले पीठ ओल्या कपड्यातही ठेऊ शकता.

पोळ्या कशा शिजवाव्या – पोळ्या कशा शिजवाव्या – पोळ्या भाजताना त्या मंद आचेवर शिजवल्याने अस्मान शिजतात अंडी कोरड्या होऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की, पण व्यवस्थित गरम करूनच त्यानंतर पोळ्या भाजायला सुरुवात करा

 

 


हेही वाचा : Kitchen Tips : महिलांसाठी 10 स्पेशल मानिनी टीप्स

- Advertisment -

Manini