लहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे कॉर्न. कॉर्नचे सगळेच पदार्थ छान चविष्ट लागतात. तसेच रवा कॉर्न बॉल्स हे हेल्दी आणि टेस्टी लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी ही डिश सगळ्यात बेस्ट आहे.
साहित्य
- स्टफिंगसाठी – ४ टेबलस्पून – उकडलेले कॉर्न
- 4 चमचे – किसलेले चीज
- 2 चमचे – ओरेगॅनो
- 1 चिरलेली हिरवी मिरची
- 4 पाकळ्या – चिरलेला लसूण
- मीठ चवीनुसार
- 2 उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे
- बाह्य आवरणासाठी – 1 कप – रवा
- 1 कप गरम पाणी
कृती
- सर्वातप्रथम स्टफिंग साहित्य एकत्र नीट मिक्स करून घ्या.
- 2 ते 3 मिनिटे रवा चांगला भाजून घ्या. रवा भाजून झाल्यांनतर त्यात गरम पाणी आणि मीठ घाला.
- रवा भाजताना लक्ष लक्ष ठेवा जेणेकरून रवा आणि पाणी थंड झाल्यावर त्याचे बॉल्स चांगले येतील.
- आता स्टफिंगसाठी साहित्य रव्याच्या मिश्रणात एकत्र करून घ्या. यानंतर याचे गोळे करून घ्या.
- गोळे तयार झाल्यावर गोळ्यांना बाहेरून रवा लावून घ्या.
- हे झाल्यावर रवा कॉर्न बॉल्स छानपैकी खरपूस टाळून घ्या.