भात हा असा पदार्थ आहे जो सगळ्यांना खूप आवडतो. तसेच भाताचे अनेक प्रकार आपण घरी सुद्धा करतो. अशातच साधा भात किंवा पुलाव भात खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही आंबट तिखट टोमॅटो भात नक्की ट्राय करा. जाऊन घेऊया टोमॅटो भातासाठी लागणारे साहित्य आणि कृती….
साहित्य
- 1 वाटी तांदूळ.
- 4 ते 5 टोमॅटो.
- पाव चमचा मिरे.
- 2 लवंगा.
- अर्धा दालचिनी.
- 3 लाल मिरच्या.
- अर्धा इंच आले.
- अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा चव.
- 1 छोटा कांदा.
- 2 लसूण पाकळ्या
- तमालपत्र 1 पान.
- जराशी साखर.
- चवीनुसार मीठ.
- तूप.
- तेल.
- कोथिंबीर.
कृती
- टोमॅटो उकडून घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. तांदूळ तासभर आधी धुवून ठेवावे.
- कांदा बारीक चिरून घ्यावा आणि चांगला तेलात परतून घाव्या.
- नंतर कांदा, आलं, दालचिनी, लवंगा, मिरची हे सर्व बारीक वाटावं.
- हे झाल्यावर पॅनमध्ये पाव वाटी तेल घालून त्यावर वाटलेला मसाला घालावा.
- आता हे मसाले नीट परतून घ्यावे आणि त्यात तांदूळ घालावे. आणि सगळे मिश्रण पुन्हा एकदा परतून घ्यावे.
- तांदुळ शिजताना चवीप्रमाणे मीठ व हवी असल्यास साखर घालावी.
- आता भाताला चांगली वाफ आल्यावर त्यात टोमॅटोचा रस व दोन चमचे साजूक तूप घालावे.
- टोमॅटो भात सर्व्ह करण्याच्या वेळी त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर टाकावी.
हेही वाचा : Nachni Recipe : पौष्टिक नाचणी कटलेट
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -