क्रिस्पी पनीर ही डिश सगळ्यांची आवडती डिश आहे. अशातच पनीरपासून बनवलेले क्रिस्पी पनीर स्नॅक्सही सगळ्यांना खूप आवडतात. तसेच आता हॉटेल स्टाईल क्रिस्पी पनीर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवू शकतात. जाणून घ्या क्रिस्पी पनीरसाठी लागणारे साहित्य आणि कृती…
साहित्य
- 250 ग्रॅम
- कॉर्न फ्लोअर – 5 चमचे
- आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
- हिरवी मिरची चिरलेली – 2-3
- साखर – 1 टीस्पून
- चिरलेली शिमला मिरची – 2 चमचे
- लाल मिरची पावडर – 2 चमचे
- हिरवे कांदे 2 चमचे
- पाने – सॉस – 1 टेबलस्पून
- रेड चिली सॉस – 2 टेबलस्पून
- सोया सॉस – 1 टीस्पून
- शेझवान सॉस – 2 टेबलस्पून
- तेल – तळण्यासाठी
- मीठ – चवीनुसार
कृती
- कुरकुरीत पनीर बनवण्यासाठी प्रथम पनीर घ्या आणि त्याचे लांबट तुकडे करा.
- आता एक वाडगा घ्या आणि त्यात कॉर्नफ्लोअर आणि थोडे मीठ मिक्स करा.
- यानंतर थोडे पाणी घालून घट्ट द्रावण तयार करा.
- आता या द्रावणात पनीरचे तुकडे टाका आणि चांगले मॅरीनेट करा.
- आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा.
- तेल गरम झाल्यावर मॅरीनेट केलेले पनीरचे तुकडे घालून तळून घ्या.
- गोल्डन ब्राऊन झाल्यावर पनीरचे तुकडे एका प्लेटमध्ये काढा.
- आता दुसरे पॅन घ्या आणि त्यात थोडे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर आले-लसूण पेस्ट घालून हलके परतून घ्या.
- हे झाल्यावर त्यात चिरलेली हिरवी मिरची आणि सिमला मिरची घालून शिजू द्या.
- मिरच्या मऊ झाल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर आणि टोमॅटो सॉस, सोया सॉस, लाल मिरची सॉससह सर्व सॉस घाला आणि चांगले मिसळा.
- त्यानंतर त्यात मीठ टाका आणि चांगले मिक्स करून घ्या.
- ग्रेव्ही चांगली शिजल्यावर त्यात आधी तळलेले पनीरचे तुकडे घालून ग्रेव्हीमध्ये चांगले मिसळा.
- आता 1-2 मिनिटे शिजू द्या. त्यावर हिरव्या कांद्याची पाने आणि थोडी साखर घाला.
- स्वादिष्ट कुरकुरीत पनीर तयार आहे. एका प्लेटमध्ये ठेवा आणि सर्व्ह करा.
हेही वाचा :
Cheese खात नसाल तर ‘हे’ पर्याय करा ट्राय
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -