श्रावणात गोड पदार्थ हमखास केले जातात. अशातच मालपोळी हा मालवणी स्पेशल गोड पदार्थ गावच्या ठिकाणी आवर्जून केला जातो. तुम्ही सुद्धा यंदाच्या श्रावणात स्पेशल ‘मालपोळी करूनच बघा. ‘मालपोळी’ कशी बनवायची जाऊन घ्या साहित्य आणि कृती…
साहित्य
- 1/2 कप गव्हाचं पीठ
- 1/2 कप तांदुळाचे पीठ
- 1/2 कप बेसन
- 1 कप गुळ
- 2 +1/2 कप दूध /पाणी
- 1 टेबलस्पून जिरें पावडर
- 1 टीस्पून वेलची पावडर
- 1/2 टेबलस्पून कुटलेली बडीशेप
- 1/4 टेबलस्पून हळद
- 1/4 कप तूप / तेल
- चिमूटभर मीठ
कृती
- सर्व पीठ चाळून एकत्र करून त्यात मीठ, बडीशेप, हळद, जिरें पावडर घालून मिक्स करावे.
- गुळ दुधात घालून विरघळे पर्यंत हलवून घ्यावे. नंतर गाळून घ्यावे.
- मिक्स केलेल्या पीठात दूध घालून घोळून मिश्रण तयार करून घ्यावे.
- गॅसवर मध्यम आचेवर तवा तापवून त्याला तूप लावून मालपोळी सोडावी.
- दोन्ही बाजूने तूप लावून गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्यावे.मालपोळी तयार.
हेही वाचा : श्रावणात करा तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -