थालीपीठ हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ असले तरी आता सर्वत्र त्याची पसंती होत आहे. उपवासाच्या वेळी थालीपीठाला थोडे वळण देऊन साबुदाण्यापासून पौष्टिक थालीपीठ तयार करता येते. तसेच साबुदाणा थालीपीठ हे शरीरासाठी चांगले तसेच चविष्ट लागते. अशातच आता आपण जाणून घेऊया साबुदाणा थालीपीठ रेसिपी कशी बनवायची.
साहित्य
- 1/2 कप- साबुदाणा
- उकडलेले बटाटे –2
- शिंगाड्याचे पिठ – 1/2 कप
- भाजलेले शेंगदाणे –1/4 वाटी
- चिरलेली हिरवी मिरची – 1
- चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी
- लिंबू – 1
- तेल – आवश्यकतेनुसार
- मीठ – चवीनुसार
कृती
- साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा स्वच्छ करून पाण्यात भिजत घालून 2-3 तास ठेवा.
- यानंतर साबुदाणा फुगून छान मऊ होईल.
- हे झाल्यावर साबुदाणा नीट गाळून घ्या आणि थोडा वेळ तसाच राहू द्या म्हणजे साबुदाण्याचे अतिरिक्त पाणी निघून जाईल.
- आता बटाटे उकडून घ्या आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
- यानंतर कढईत शेंगदाणे टाकून मंद आचेवर तळून घ्या.
- शेंगदाणे थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या.
- आता एका मोठ्या भांड्यात साबुदाणा टाका. उकडलेले बटाटे मॅश करून मिक्स करावे.
- नंतर त्यात पीठ, बारीक वाटलेले शेंगदाणे, चिरलेली हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर घालून सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- आता चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता तयार मिश्रणाचे समान प्रमाणात गोळे बनवा.
- हे गोळे बनून झाल्यावर आता हे थालीपीठ थापून घ्या.
- आणि हे थालीपीठ आता नॉनस्टिक तव्यावर खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
- चविष्ट साबुदाणा थालीपीठ तयार आहे. ते दही किंवा रायत्यासोबत सर्व्ह करता येते.
हेही वाचा :
Shravan Recipe : श्रावणात ट्राय करा गूळ-खोबऱ्याच्या सारोट्या
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -