Sunday, February 25, 2024
घरमानिनीKitchenRecipe : चटपटीत टोमॅटो कोथिंबीर चटणी

Recipe : चटपटीत टोमॅटो कोथिंबीर चटणी

Subscribe

जेवणासोबत काहीतरी चटपटीत आपल्याला लागत. तसेच भाजी खाऊन सुद्धा सारखा कंटाळा येतो. तर मग भाजी आणि भातासोबत टोमॅटो आणि कोथिंबीरची चटणी नक्की ट्राय करा.

साहित्य

 • 4 ते 5 टोमॅटो.
 • कोथिंबीर.
 • अर्धा चमचा हिंग.
 • अर्धा चमचा साखर.
 • 1 टेबलस्पून मीठ.
 • 3-4 कढीपत्ता.
 • 4-5 हिरव्या मिरच्या.
 • फोडणीसाठी तेल.

Spicy Chilli and tomato chutney - The Chilli Workshop

कृती

 • सर्वातप्रथम तेलाची फोडणी करून त्यात हिंग, कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ त्यात घालावे.
 • त्यावर उकडलेल्या टोमॅटोची पेस्ट घालावी.
 • पेस्ट करून झाल्यावर कोथींबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची सुद्धा पेस्ट करून घ्यावी.
 • यानंतर त्यात मीठ, साखर घालून हे मिश्रण परतावं. हे झाल्यावरव त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.
 • नंतर हे मिश्रण गार झाल्यावर हवी असल्यास हि चटणी मिक्सरमध्ये पुन्हा वाटून घ्यावी.
 • आता तयार आहे टोमॅटो कोथिंबीरीची चटपटीत चटणी.

हेही वाचा : Mirchi Thecha : घाटी स्टाईल लाल मिरचीचा ठेचा नक्की ट्राय करा

- Advertisment -

Manini