सर्वात लोकप्रिय आणि स्वादिष्ट डिश म्हणून दुधी हलवा हा ओळखला जातो. तसेच बरेच जण दुधीची भाजी म्हटलं की नाकं मुरडतात. पण दुधीचा हलवा मात्र बरीच मंडळी आवडीने खाताना पाहायला मिळतात. हा हलवा जितका चवीस स्वादिष्ट आहे तितकीच याची डिश बनवण्यास देखील सोपी आहे.
साहित्य
- 1/2 किलो दुधी
- 1 वाटी दूध
- 2 चमचे साजूक तूप
- 100 ग्रॅम साखर
- 50 ग्रॅम खवा
- 1/2 चमचा वेलची पावडर
- थोडे मिक्स ड्रायफ्रुट्स
कृती
- सर्वातप्रथम दुधी स्वच्छ धुऊन त्याची सालं काढून घेणे आणि मग दुधी खिसणीने खिसुन घेणे.
- नंतर गॅस वर एक भांडे ठेवून त्यात दुधीचा किस काढून घेणे व त्यात दोन चमचे साजूक तूप घालावे व ते चांगले परतून घेणे.
- त्यातील पाणी आटल्यावर त्यात दूध घालणे व ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालून चांगले शिजवून घेणे.
- त्यानंतर दुधाचे प्रमाण कमी झाल्यावर त्यात साखर चांगली एकजीव करून घ्यावी.
- हे झाल्यावर त्यात वरून खवा टाकून हे मिश्रण चांगले मिक्स करून घेणे.
- तसेच दुधी हलवा बनवताना त्यावर झाकण अजिबात ठेवू नका यामुळे त्यात पाणी राहते.
- आता तयार झाला छान पौष्टिक चविष्ट दुधी हलवा.