Friday, April 19, 2024
घरमानिनीKitchenPani Puri Recipe : घरच्या घरी बनवा टेस्टी पाणी पुरी

Pani Puri Recipe : घरच्या घरी बनवा टेस्टी पाणी पुरी

Subscribe

पाणीपुरी हा विषय सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. पाणीपुरीचं फक्त नाव जरी ऐकलं तरी पण कित्येक लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. विशेषत: महिलांना हा पदार्थ खूपच आवडतो. थोड गोड- आंबट , थोडं तिखट असं पाणी आणि रगडा भरलेल्या पुरीचा घास तोंडात जाताच मनाची तृप्तता होते. बाहेरची पाणी पुरी चवीला जरी चांगली असली तरी पोटासाठी ती चांगली नसते. पाणीपुरी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येते. लहान मुलांना आवडणारी पाणीपुरी खरतर घरीच बनवायला हवी. यामुळे लहान मुलं आवडीने मनसोक्त घरात बसून खातात.

Pani Puri Recipe

- Advertisement -

साहित्य-

  • मैदा – 1/4 कप
  • रवा – 1 कप,
  • उकडलेले बटाटे- 4-5
  • दही – 1/2 कप
  • उकडलेले पांढरे चणे – 1/2 कप
  • बारीक चिरलेला कांदा – 1
  • चिंचेची चटणी – 2 मोठे चमचे
  • चाट मसाला – 1/2 चमचे,
  • बूंदी – 1/4 कप
  • हिरवी मिरची – 2
  • जलजीरा – 1 पाकीट
  • काळी मिरी पावडर – 1/2 टी स्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – 1/4 कप
  • मीठ – चवीनुसार

Pani puri recipe - BBC Food

- Advertisement -

पुरी बनवण्याची कृती-

  • पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये रवा, मैदा आणि थोडेसे मीठ घालून मिश्रण नीट मिसळून घ्यावे.
  • नंतर त्यात गरजेनुसार थोडं-थोडं पाणी घालून घट्ट कणीक मळून घ्यावी.
  • त्यावर ओले कापड ठेऊन कणीक थोडा वेळ मुरु द्यावी.
  • 15 -20 मिनिटांनंतर कणीक पुन्हा थोडी मळावी, ती छान एकजीव होते.
  • त्यानंतर कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत व पुऱ्या लाटून घ्याव्यात.
  • एक कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल ओतावे. तेल चांगले, कडकडीत गरम झाल्यानंतर लाटलेल्या पुऱ्या हळूहळू त्यात सोडाव्यात.

Pani Puri | Golgappe - Chef Kunal Kapur

पाणीपुरीचा मसाला कृती-

  • उकडलेले बटाटे चिरावेत आणि एका भांड्यात घेऊन चांगले मॅश करावेत.
  • त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी व मिश्रण एकजीव करावे.
  • त्यामध्ये काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण पुन्हा एकत्र मिसळावे.
  • त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात जलजीरा घालून आंबट पाणी तयार करून घ्यावे.
  • आवडत असल्यास त्यात थोडी बूंदी घालावी.
  • आता एका ताटलीत तळलेली पुरी घेऊन ती अंगठ्याने हलका दाब देऊन फोडावी.
  • त्यामध्ये बटाटा- पांढरे चणे- कांदा याचे थोडे मिश्रण भरावे.
  • त्यावर चिंचेची चटणी, आंबट पाणी आणि हवे असल्यास थोडी कोथिंबीर घालावी.
  • अशा रितीने घरच्या घरी स्वादिष्ट पाणी-पुरीचा आनंद लुटा.

हेही वाचा : Mayonnaise Salad Recipe : मिक्स व्हेजिटेबल मेयो सॅलड

- Advertisment -

Manini