Sunday, April 14, 2024
घरमानिनीKitchenफ्रीजमधलं कडक पनीर सॉफ्ट करण्यासाठी टिप्स

फ्रीजमधलं कडक पनीर सॉफ्ट करण्यासाठी टिप्स

Subscribe

फ्रीजमध्ये ठेवल्याने अनेकदा पनीर कडक तर होतेच शिवाय अनेक दिवस ठेवल्यास ते शिळे होऊ लागते. अशा वेळी काही उपाय केल्यास ते पुन्हा सॉफ्ट आणि स्पंजी होते.

- Advertisement -

बाजारातून पनीर आणल्यानंतर, किमान दोन ते तीन वेळा ते पाण्याने चांगले धुणे आवश्यक आहे. पनीर  प्रथिनांचा स्रोत आहे आणि प्रथिने लवकर खराब होतात. त्यामुळे स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

- Advertisement -

पनीर पाण्याने नीट धुवा. नंतर एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात मीठ आणि हळद मिसळा. नंतर या पाण्यात पनीर घालून फ्रिजमध्ये ठेवा. अशा प्रकारे पनीर फ्रीजमध्ये ठेवल्यास ते ताजे आणि मऊ राहते. तसेच, ते किमान दोन ते तीन दिवस खराब होत नाही आणि खाण्यायोग्य स्थितीत राहते. जर पनीर योग्य पद्धतीने साठवले नाही तर ते रेफ्रिजरेटरमध्ये देखील खराब होते आणि वापरासाठी अयोग्य होते.

पनीरचे चौकोनी तुकडे करायचे असल्यास एका भांड्यात पाणी कोमट गरम करून त्यात मीठ घाला. त्यानंतर पनीरचे तुकडे दहा मिनिटे पाण्यात ठेवा. नंतर सर्व पाणी काढून टाका आणि पनीरचे चौकोनी तुकडे बोटांनी दाबा. यामुळे पनीर पुन्हा सॉफ्ट आणि स्पंजी होईल.

- Advertisment -

Manini