Saturday, September 30, 2023
घर मानिनी Kitchen उकडीचे मोदक करताना फुटतात मग वापरा 'या' टिप्स

उकडीचे मोदक करताना फुटतात मग वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

येत्या मंगळवारी म्हणजेच 19 सप्टेंबरला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे. यानिमित्ताने घरोघरी साफ-सफाई आणि सजावटीसाठी लगबग सुरु झाली आहे. तसेच बाप्पाच्या आगमनाने आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. गणेश चतुर्थीला गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर मऊसूत आणि चविष्ठ उकडीच्या मोदकांचा नवैद्य दिला जातो.

यामुळे अनेक घरात उकडीचे मोदक बनवण्याचा घाट घातला जातो. अनेकजण साच्याने किंवा हाताने कळ्या पाडून मोदक तयार करतात. पण कळ्या पाडून तयार केलेले मोदक दिसायलाही खूप सुरेख दिसतात. पण कळीदार मोदक सगळ्यांनाच येतात असे नाही. हे करत असताना अनेकवेळा मोदक फुटतात किंवा त्यातले सारण बाहेर येते. आणि संपूर्ण मोदक यामुळे फुटतो.

- Advertisement -

अशावेळी मोदकाच्या कळ्या चांगल्या बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक जाणून घेणारा आहोत ज्या तुम्ही फॉलो करुन उकडीचे कळीदार मोदक अगदी सुंदररित्या बनवू शकता. तसेच तुम्हाला कळीदार मोदकांसाठी छोट्या चमच्याची गरज लागणार आहे. चला मग जाणून घेऊया सोप्या आणि झटपट टिप्स…

 • सगळ्यात आधी मोदकाला लागणारी तांदळाची उकड व्यवस्थित शिजवून घ्या.
 • कधी कधी उकड नीट शिजली नाही तर मोदक चिकट होतात.
 • तांदळाच्या उकडीसाठी आंबेमोहोर,इंद्रायणी किंवा नवीन तांदूळ वापरावा कारण त्याला चिकटपणा चांगला असतो.
 • तसेच यामुळे पिठाची उकड छान लुसलुशीत होते.
 • उकड काढताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरल्यास मोदक पांढरे शुभ्र आणि मऊ होतात.
 • तसेच उकड काढताना पाण्यात जरासे तूप टाकावे,त्यांनतर पाण्यात गरजे इतके पाणी टाकून उकळून घ्यावे.
 • मात्र तूप टाकताना प्रमाणात टाकावे जसे कि 1 वाटी पिठाला अर्धा चमचा तूप टाकावे.
 • तूप टाकल्यामुळे मोदकांना छान लकाकी येते आणि मोदक वळताना उकड हाताला चिटकत नाही.
 • आणि मग तांदळाचे पीठ टाकून हलक्या हाताने ढवळून घ्यावे.
 • महत्वाचे म्हणजे मोदक उकडताना लांब लांब ठेवावे जेणेकरून मोदक हे एकमेकांना चिटकून राहणार नाहीत.
 • तसेच मोदक कोरडे वाटत असतील तर ते पाण्यात बुडवून वाफवून घ्या त्यामुळे मोदक फुटणार नाहीत.
- Advertisement -

______________________________________________________________________

हेही वाचा : Milk Barfi : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा दूधाची बर्फी

- Advertisment -

Manini