आपण बहुतेक वेळा पोळ्या बनवण्यासाठी कंटाळा करतो. पण जर का काही टिप्स वापरल्या तर पोळ्या अगदी सहज आणि पटकन बनतात. अशातच जर का पोळी फुगली नाही तर खाणाऱ्याला किंवा बनवणाऱ्याला त्याचा आनंद मिळत नाही. जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हातांनी मऊ आणि गोलाकार पोळी बनवायची असतील तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.
- Advertisement -
- मऊ पोळ्यांसाठी, नेहमी पिठात थोडे थोडे पाणी घाला आणि पीठ कमी प्रमाणात मळून घ्या.
- जरा जरासे पाणी घालत राहा आणि पीठ मळून घ्या, यामुळे पीठ जास्त घट्ट होत नाही.
- अशा प्रकारे पीठ मळून घ्या. यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
- पीठ मळत असताना लक्षात ठेवा की पीठात जास्त पाणी घालू नये किंवा ते जास्त खूप ओले करू नये.
- पीठ मळून झाल्यावर पिठाला तेलाचा हात लावून मळून घ्या. यामुळे पीठ वातड होणार नाही.
भात शिजवताना आपल्याला नेहमी टेन्शन असतं ते म्हणजे भात कसा होईल. तसेच कोणताही भात करताना त्यात पाणी किती प्रमाणात घालावे हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. अशातच जर का तुम्व्हा भात चिकट किंवा मोकळा होत नसेल तर काही टिप्स आहेत ज्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही.
- Advertisement -
- तांदळात नेहमी योग्य प्रमाणात पाणी घाला. नेहमी तांदूळ गॅसवर ठेवण्यापूर्वी अर्धा तास भिजत ठेवा.
- जेवढा भात शिजवायचा आहे त्याच्या दीडपट पाणी घ्या.
- वास्तविक, जास्त पाणी असल्यास तांदूळ चिकट होतो. त्याचबरोबर पाणी कमी झाले तर भात कच्चा राहतो.
- सवर तांदूळ ठेवल्यावर पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या.
- यामुळे तांदूळ चिकटणार नाही आणि लिंबू अतिरिक्त पाण्याचे संतुलन राखण्याचे काम करते.
- बहुतेक लोक तांदूळ मध्यम किंवा मंद आचेवर शिजवतात परंतु असे केल्याने तांदूळ खराब होऊ शकतो. म्हणून तांदूळ नेहमी हाय फ्लेमवर शिजवा.
- कुकरमध्ये जर का तुम्ही भात शिजवत असाल तर फक्त दोन शिट्ट्या काढा. कारण कुकरमध्ये भात लवकर शिजतो.