Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen तळणीच्या उरलेल्या तेलाचे करायचं काय?

तळणीच्या उरलेल्या तेलाचे करायचं काय?

Subscribe

आपल्या भारतीय घरातील अन्न तळल्याशिवाय अपूर्ण राहते. सण असो किंवा इतर कोणताही खास प्रसंग, पुरी, भजे आणि तळलेले पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या घरात नक्कीच बनतात. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. अशावेळी तळलेल्या तेलाचे काय करावे असा प्रश्न पडतो. अशातच त्या तेलाचा पुन्हा वापर कसा व कधी करावा असे अनेक प्रश्न गृहिणींना पडलेले असतात.

तसंच, तेल अनेकदा गरम केल्यास शरीरात ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढतो. यामुळं शरीरात खतरनाक फ्री रेडिकल वाढतात. यासोबतच लिव्हर, किडणी आणि फुफ्फुसांचे आजार वाढीस लागतात. अशावेळी तळणासाठी घेतलेले तेल कढईत जास्त उरले ते तर आपण फेकून देऊ शकत नाही. तर या तेलाचे काय करावे याची माहिती आज आपण जाणून घेऊया.

- Advertisement -

How to Clean Used Cooking Oil - I Am Homesteader

तळणीचे तेल असे वापरा

  • तळण्याचे तेल पुन्हा वापरण्यासाठी, ते चांगले फिल्टर करणे आवश्यक आहे.
  • जेणेकरुन सर्व जळलेले अन्नाचे कण काढून टाकले जातील.
  • एकदा तळलेले तेल पुन्हा वापरताना केवळ भाजी बनवण्यासाठी वापरा.
  • उच्च हीटवर तळण्यासाठी ते पुन्हा वापरणे टाळा.
  • तळलेले तेल दोन दिवसातच वापरावे.
  • जर तुम्हाला तेल पुन्हा वापरण्या योग्य ठेवायचे असेल तर ते कमी तापमानातच वापरा.
  • जेणेकरून तेलातून धूर निघणार नाही.
  • तेलात पदार्थ तळताना उरलेले कण लगेच काढून टाकावेत. जळल्यानंतर ते कण काळे होणार नाहीत.
  • तळण्यासाठी नेहमी स्टीलचे भांडे वापरावे.
  • लोखंडी भांड्यात तेल टाकून तळण्याचे काम करू नये.
  • अशा तेलात एक विचित्र वास येऊ लागतो आणि ते पुन्हा वापरण्यास योग्य नाही.

हेही वाचा :

नागपंचमीला बनवा दूध आणि तांदळाची खीर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini