प्रत्येकालाच आपल्यावर आणि घरावर देवी लक्ष्मी प्रसन्न असावी असे वाटते. यासाठी देवी लक्ष्मीची व्रत-व्यक्यल्ये केली जातात. घरात सुख- शांती नांदण्यासाठी अनेक उपायही करण्यात येतात. घराच्या वास्तूबाबत वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. वास्तूशास्त्रात सांगितलेल्या नियमांप्रमाणे घराची वास्तू असल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक परिणाम दिसू लागतात आणि पैशांच्या अडी-अडचणीही दूर होतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला शास्त्रात सांगितलेल्या अशा वस्तू सांगणार आहोत, ज्या घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा सदैव राहते.
कासव –
शास्त्रानुसार घरात कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. खरं तर, कासवाचा थेट संबंध भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीशी आहे. यामुळे घरात कासव ठेवणे शुभ मानले जाते. तुम्ही घराच्या उत्तर दिशेला धातुपासून तयार केलेला कासव ठेवू शकता. यामुळे पैशांची चणचण निर्माण होत नाही.
नारळ –
घरात नारळ ठेवल्याने पैशांच्या अडचणी दूर होतात. आर्थिक परिस्थिती सुधारते. असे म्हणतात की, नारळात देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे नारळ घरात ठेवायला हवे. या उपायामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
शाळीग्राम –
असे म्हणतात की, शाळीग्रामची नित्यनेमाने पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते. यासाठी तुम्ही देव्हाऱ्यात शाळीग्राम ठेवून पूजा करू शकता.
शंख –
शंख देवीला अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की, समुद्रमंथन जेव्हा झाले तेव्हा देवी लक्ष्मीसोबत शंख बाहेर पडला. त्यामुळे अशी मान्यता आहे की, जिथे शंख ठेवला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो.
मोरपिस –
तुम्ही देव्हाऱ्यात किंवा घरात मोरपिस ठेवू शकता. भगवान श्री कृष्णाला मोरपिस अत्यंत प्रिय होती. भगवान श्री कृष्णाला भगवान विष्णूंता अवतार मानला जातो. त्यामुळे तुम्ही लक्ष्मीचा कृपा आशिर्वाद राहण्यासाठी घरात मोरपिस ठेवू शकता.
पिरॅमिड –
शास्त्रानुसार, पिरॅमिड घरात ठेवल्याने शुभ परिणाम मिळतात. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुम्ही आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कोणत्याही धातूचा पिरॅमिड घरी ठेवू शकता.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde