हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. ही चतुर्थी माघ महिन्यात येत असल्याने माघी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. यंदा 1 फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी श्री गणेशाची विधीपूर्वक आणि भक्तीभावाने पूजा केली तर व्यक्तीला बुद्धी, बळ, सुख-समृद्धी प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊयात, माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त आणि तिथी
गणेश जयंती तिथी –
पंचांगानुसार, यंदा 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी सुरू होईल तर रविवारी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 14 मिनिटांनी समाप्त होईल.
पुजनाचा मुहूर्त –
गणेश पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 36 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 40 मिनिटांपर्यत आहे. त्यानुसार, पूजेला 2 तास 2 मिनिटांचा कालावधी असणार आहे.
चंद्रदर्शनाचा निषिद्ध वेळ –
गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहण्यास मनाई आहे. या दिवशी सकाळी 08.52 ते 21.01 पर्यत चंद्र पाहू नये.
माघी गणेश जयंती आणि गणेश जयंतीमध्ये फरक काय?
गणेश जयंती –
आषाढ महिन्यात शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीचा उत्सव येतो. या दिवशी श्री गणेशाची स्थापना केली जाते. आषाढ महिन्यातील हा उत्सव 10 किंवा 12 दिवसांचा असतो.
माघी गणेश जयंती –
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा उत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला . त्यामुळे हा उत्सव साजरा केला जातो. या गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असेही म्हणतात.
हेही पाहा –