हिंदू धर्मात विवाहाला चार महत्वपूर्ण संस्कारांपैकी एक मानले जाते. यामुळे या संबंधित काही विधीपूजा केल्या जातात. लग्नापूर्वी, लग्नादरम्यान आणि लग्नानंतर सुद्धा काही रीति-रिवाज असतात ते पूर्ण झाल्यानंतर लग्न संपन्न होते. अशातच आम्ही तुम्हाला लग्नानंतर होणाऱ्या एका महत्वपूर्ण परंपरेबद्दल सांगणार आहोत.
तांदूळ हे असे एक तृणधान्य आहे की ज्याचा उपयोग विवाह प्रसंगी वधू-वरांना आशीर्वाद देताना अक्षता या नावाने त्यांचा उपयोग होतो. या अक्षता कौमार्याचे, अखंडतेच्या प्रतीक आहेत. ती नवरी जेव्हा आपल्या नव्या घरी येते, आणि दारात उभी राहते, तेव्हा एक माप अशा अक्षता नी भरून दरवाज्यात ठेवले जाते.
नववधूला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. गृहप्रवेशावेळी ही परंपरा पार पाडली जाते. तांदळाला हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जात असून ते स्थिरतेचे प्रतीक मानले जाते. यामुळेच तांदळाने भरलेले माप ठेवले जाते. जेव्हा ती ते माप ओलांडून घरात प्रवेश करते तेव्हा असे मानले जाते की, घरात आयुष्यभर सुख-समृद्धी सुद्धा येते. जेव्हा घरात नववधू प्रवेश करते त्यानंतर घरातील कुमारिकांना पैसे किंवा एखादी भेटवस्तू दिली जाते. हे प्रतीक असे मानले जाते की, घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे. तसेच ती आपल्या सोबत धन-संपदा घेऊन आली आहे.
माप ओलांडण्याआधी वराच्या घरी स्वच्छता, झाडलोट करून लक्ष्मीपूजनाची तयारी केलेली असते.त्यामुळे माप कलंडताना पसरलेल्या अक्षता स्वच्छ धुवून त्यांचा पुर्नवापर करणे किंवा एखाद्द्या गरीबाला ते शिधा म्हणून देणे सहज शक्य आहे.