हिंदू धर्मग्रंथांमध्ये महाशिवरात्रीच्या सणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या शुभ तिथीला, भक्त महादेव आणि माता पार्वती यांची विशेष प्रार्थना करतात . या दिवशी पूजा केल्याने पती-पत्नीमधील नाते मजबूत होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच, वैवाहिक जीवन नेहमीच आनंदी राहते. भगवान शिव यांना महादेव, भोलेनाथ, शंकर, आदिदेव, आशुतोष आणि त्रिनेत्रधारी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. महादेवाला तीन डोळे असल्याने त्यांना त्रिनेत्रधारी असेही म्हटले जाते. सर्व सृष्टीचे पालनहार असणारे हे महादेव त्रिनेत्रधारी कसे बनले याविषयी आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
अशा प्रकारे महादेव झाले त्रिनेत्रधारी :
आख्यायिकेनुसार, एकदा भगवान शिव हिमालय पर्वतांवर एक सभा घेत होते. तेव्हा माता पार्वतीने गमतीगमतीत महादेवाच्या दोन्ही डोळ्यांवर हात ठेवला, ज्यामुळे संपूर्ण विश्वात अंधार पसरला आणि सर्वत्र गोंधळ माजला. भगवान शिव ही परिस्थिती सहन करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या कपाळावर एक प्रकाशाचा किरण चमकू लागला. जो महादेवाचा तिसरा डोळा बनला, ज्याने विश्वात प्रकाश आणला. यानंतर, जेव्हा देवी पार्वतीने महादेवांना तिसऱ्या डोळ्याबद्दल विचारले तेव्हा भगवान शिव म्हणाले की त्यांचे डोळे हे या जगाचे रक्षक आहेत. जर त्यांनी तिसरा डोळा प्रकट केला नसता तर विश्वाचा नाश निश्चित होता. भगवान शिवाचा तिसरा डोळा खूप शक्तिशाली मानला जातो. या डोळ्याद्वारे परमेश्वर भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान पाहू शकतो. या कारणास्तव, महादेवाचा तिसरा डोळा खूप शक्तिशाली मानला जातो.
महाशिवरात्री व्रत कसे केले जाते ?
महाशिवरात्रीचे व्रत केल्याने दु:ख, दारिद्र्य तसेच आजार कमी होऊ लागतात. शंकराच्या परिवाराची योग्य आणि षोडशोपचार पूजा केली तर सुख, समृद्धीची प्राप्ती होते. याकरता प्रथम शिवलिंगावर पंचामृत अर्पण करावे. पहिल्या वेळी पाण्याने, दुसऱ्या वेळी दह्याने, तिसऱ्या वेळी तूपाने आणि चौथ्या वेळी मधाने शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा. दूध, गुलाबजल, चंदन, दही,मध, तूप साखर आणि पाणी यांचा वापर करून भगवान शंकराला तिलक आणि भस्म लावावे. भोलेनाथाला फळे अर्पण करावीत.
हेही वाचा : Aruna Irani Love Life : या कारणामुळे अरुणा इराणींनी लपवलं लग्न अन् घेतला आई न होण्याचा निर्णय
Edited By – Tanvi Gundaye