महाशिवरात्रीचा सण हिंदू धर्मात खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शिवभक्तांसाठी हा एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे. या दिवशी संपूर्ण देश शिवाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसतो. वर्षभर शिवभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पहातात. यंदा (आज) 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी होत आहे. आत्मशुद्धी, मोक्ष आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महाशिवरात्रीचा मुहूर्त सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते. या दिवशी भक्तगण विविध मंदिरात शिवाच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. महादेवाची मनोभावे पूजा करून शिवाला बेलपत्र अर्पण करतात. यासह महाशिवरात्रीला शिवाची मनोभावे पूजा केली जाते. असे म्हणतात की, महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करताना शिवंलिगावर काळे तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊयात, शिवंलिगावर काळे तीळ अर्पण करण्याचे महत्त्व
काळे तीळ अर्पण करण्याचे महत्त्व
- असे मानले जाते की, शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही नक्कीच काळे तीळ अर्पण करू शकता.
- शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी काळे तीळ अर्पण करावेत.
- महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगावर काळे तीळ मिसळलेले दूध अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने आयुष्यात आनंद, शांती नांदते.
- जर घरात वारंवार कोणी आजारी पडत असल्यास शिवाला काळे तीळ अर्पण करावेत. या उपायाने आजारी व्यक्ती लवकर बरी होते.
- पितृदोष असेल तर शिवलिंगावर महाशिवरात्रीला काळे तीळ अर्पण करावेत. या उपायाने पितरांना शांती मिळते असे म्हणतात.
- महाशिवरात्रीला शिवलिंगावर काळे तीळ मिक्स केलेले दूध अर्पण करावे. असे केल्याने राहूचा तुमच्यावर आणि तुमच्या घरावर होणारा प्रभाव कमी होतो.
- प्रगतीत सतत अडथळे असतील तर महाशिवरात्रीला काळे तीळ दुधात मिक्स करून शिवलिंगावर अर्पण करावेत, असे केल्याने यश तुमच्याकडे धावत येईल, असे म्हणतात.
- शनीची साडेसाती सुरु असेल तर काळे तीळ शिवलिंगावर अर्पण करावेत. शनीची साडेसाती दूर होईल.
काळे तीळ अर्पण करण्याची पद्धत –
- सर्वात आधी स्नान करावे.
- यानंतर स्वच्छ कपड़े घालावेत.
- एका भांड्यात दूध घ्या, त्यात काळे तीळ मिक्स करा.
- यानंतर शिवाचा मंत्र म्हणत शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत.
हेही पाहा –