Friday, January 24, 2025
HomeमानिनीRecipeMakhana Bhel : मखाना भेळ

Makhana Bhel : मखाना भेळ

Subscribe

मखाना शरीरासाठी अत्यंत पौष्टीक असतात. कधीकधी भाजलेले मखाने खायला कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही मखान्याची चटपटीत भेळ खाऊ शकता. मखाना भेळमुळे तोंडाला एक वेगळी चव मिळते आणि पोटात पौष्टिक घटकही मिळतात. पाहूयात, मखाना भेळ कशी बनवायची,

Prepare time: 10 min
Cook: 10 min
Ready in: 15 min

Ingredients

  • मखाना - 2 ते 3 कप
  • बारीक चिरलेला कांदा - 1
  • बारीक चिरलेला टोमॅटो - 1
  • तळेलेले बटाटे - पूर्णत: ऑपश्न
  • शेंगदाणे - अर्धी वाटी
  • हिरवी चटणी - 2 चमचे
  • चिचेंची चटणी - 2 चमचे
  • लिंबाचा रस
  • चाट मसाला
  • हिरवी मिरची - 1
  • कोथिंबीर
  • तूप

Directions

  1. सर्वात आधी मखाना भाजून घ्यावा.
  2. मखाना कुरकुरीत व्हायला सुरूवात झाली की त्यात थोडे तूप टाकून पुन्हा भाजून घ्यावेत.
  3. यानंतर मखाना एका भांड्यात काढून घ्यावा, यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, तळलेल्या बटाट्याचे काप मिक्स करावेत.
  4. मिश्रणात चिंचेची चटणी, हिरवी चटणी, शेंगदाणे, चाट मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून एकजीव करून घ्यावे.
  5. तुमची चटपटीत आणि पौष्टीक मखाना भेळ तयार झाली आहे.

Manini