Prepare time: 10 min
Cook: 50 min
Ready in: 1 hour
Ingredients
- म्हशीचे दूध - 1 लीटर
- मिल्क पावडर - दीड वाटी
- केसर घातलेले दूध - अर्धी वाटी
- चिरलेले काजू-बदाम - अर्धी वाटी
- साखर - अर्धी वाटी
- वेलची पावडर - अर्धा चमचा
- ब्रेड - 12 ते 15 स्लाइस
Directions
- मलई रोल बनवण्यासाठी एका कढईत दूध आणि मिल्क पावडर घेऊन एकजीव करून घ्या. जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. आता कढई गॅसवर एक उकळी येईपर्यंत मध्यम आचेवर तापत ठेवा.
- उकळी आल्यावर त्यात हळूहळू साखर मिसळा आणि मिश्रण ढवळत रहा. मिश्रण थोडे घट्ट झाले की गॅस बंद करा. आता कढईतील अर्धे दूध बाजूला काढून ठेवा.
- उरलेल्या कढईतील दुधाला पुन्हा मध्यम आचेवर उकळवत ठेवा. जेव्हा हे रबडीप्रमाणे घट्ट दिसू लागेल तेव्हा यात चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्या.
- आता ब्रेडच्या स्लाइसची किनार कापून घ्या. यानंतर लाटण्याच्या साहाय्याने ब्रे़ड पातळ लाटून घ्या. यात कढईतील मिश्रण भरा व ब्रेडचे रोल तयार करून घ्या. अशाप्रकारे सर्व ब्रेडच्या स्लाइसचे रोल तयार करून घ्या.
- आता हे रोल्स सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्या. त्यावर मगाशी बाजूला काढून ठेवलेले दूध सर्व बाजूंनी पसरवा. यानंतर केसर असलेले दूध त्यावरून एक- एक चमचा टाका.
- वरून चिरलेले ड्रायफ्रूट्स टाका. अशाप्रकारे मलई रोल तयार आहेत.