हिंदू धर्मातील सर्व 12 महिन्यांना विशेष महत्त्व आहे. त्यापैंकी एक म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे. या महिन्यात विशेष करून महाराष्ट्रात वैभव लक्ष्मीचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरूवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचे व्रत केले जाते. आपल्या कुटूंबात धन-धान्य समृद्धी नांदावी आणि कुटूंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी सुवासिनी हे व्रत करतात. त्यामुळे जाणून घेऊयात, यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे. 2024 मधील मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे. यावर्षीचा पहिला गुरूवार 5 डिसेंबर आहे. या दिवशी विनायक चतुर्थी व्रत देखील असणार आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार –
- पहिला गुरूवार – 5 डिसेंबर
- दुसरा गुरूवार – 12 डिसेंबर
- तिसरा गुरूवार – 19 डिसेंबर
- चौथा गुरूवार – 26 डिसेंबर
पुजा कशी कराल –
मार्गशीर्ष महिन्यातील या व्रताची मांडणी पुढीलप्रमाणे करावीत.
- एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा.
- कलशामध्ये पाणी भरून त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवावा.
- नारळाला महालक्ष्मीचे प्रतिक म्हणून सजवावे. यासाठी तुम्हाला दागिने, गजरा यांचा वापर करता येईल.
- बाजारातील देवीचे मुख्यवटे मिळतात, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता.
- देवी पुढे पाच फळे मांडावीत. काही ठिकाणी पाच पानांचा विडा देखील मांडला जातो.
- पूजा मांडल्यानंतर देवीचे महात्म आणि कथा यांचे वाचन करावे.
- यानंतर देवीची आरती करावी.
- नैवेद्यासाठी लाह्या, गुळा, बाताशे ठेवू शकता.
- शेवटच्या गुरूवारी या व्रताचे उद्यापन करावे.
- सुवासिनींना बोलावून हळदी-कुंकू करावे.
देवी लक्ष्मीसारखाच श्री कृष्णाला समर्पित आहे मार्गशीर्ष –
शास्त्रानुसार, मार्गशीर्ष महिना भगवान श्री कृष्णाला प्रिय मानला जातो. कदाचित तुम्हाला हे ठाऊक नसेल मार्गशीर्ष नाव श्री कृष्णाचेही आहे. असे म्हणतात की, या महिन्यात श्री कृष्णाची मनोभावे केल्यास इच्छित फळ नक्कीच मिळते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde