हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा शुभ समजला जातो. हा दिवस विशेष रितीने श्रीकृष्णाची विधीवत पूजा करण्यासाठी साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाची कृपादृष्टी जर तुम्हाला हवी असेल तर त्याच्या मंत्रांचा जप अवश्य करा. मार्गशीर्ष महिन्यात जप-तप करणे सर्वात शुभ समजले जाते. या महिन्यात पवित्र नदीमध्ये स्नान करणंही फलदायी समजलं जातं. तुम्हाला माहित आहे का मार्गशीर्ष महिन्यात दक्षिणावर्ती शंखाची पूजा करणेदेखील सर्वश्रेष्ठ समजण्यात आले आहे.
मार्गशीर्ष महिन्यात दक्षिणावर्ती शंखाची पूजा करण्याचे महत्त्व :
धार्मिक मान्यतेनुसार, मार्गशीर्ष महिन्याला श्रीकृष्णाचा महिना असे म्हटले जाते. या महिन्यात लक्ष्मीदेवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात समस्या सुरू असतील तर मार्गशीर्ष महिन्यात पूजा पाठ केल्याने सुखसमृद्धी आणि सौभाग्य यांमध्ये वृद्धी होऊ शकते. या महिन्यात दक्षिणावर्ती शंखाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या महिन्यात शंखाची पूजा केल्याने धनधान्याची प्राप्ती होते आणि वास्तूदोषापासूनही सुटका मिळते.
दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मीदेवीतचा भाऊ समजले जाते. असं म्हटलं जातं की ज्या घरात शंख असतो त्या घरात लक्ष्मीमातेचा वास असतो. आणि मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाला शंखाने जलाभिषेक करण्याचेही काही नियम सांगण्यात आले आहे. दक्षिणावर्ती शंखाची पूजा विधीवत रुपाने केली गेली पाहिजे. यामुळे घर नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार समजला जातो. यासाठी विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या पूजेकरता दक्षिणावर्ती शंखाचा उपयोग केला जातो. असं केल्याने दु:ख आणि दारिद्र्य यांचा सामना करावा लागत नाही आणि आजारांपासूनही व्यक्तीची सुटका होते.
दक्षिणावर्ती शंखाची पूजा करण्याचे नियम :
शंख लाल रंगाच्या कपड्यामध्ये लपेटून ठेवा. लाल रंग लक्ष्मीचा प्रिय रंग समजला जातो.
शंखामध्ये गंगाजल भरून ‘ॐ श्री लक्ष्मी सहोदराय नमः’या मंत्राचा जप करा.
शंख हा पूजा स्थळावर किंवा घराच्या मंदिरामध्ये स्थापित करा.
मार्गशीर्ष महिन्यात शंखाच्या समोर रोज शुद्ध तूपाचा दिवा लावावा.
शंख वाजवताना आपले तोंड दक्षिण दिशेला असावे.
हेही वाचा : Vastu Tips : घराबाहेर पारिजातकाचे झाड असणे शुभ की अशुभ ?
Edited By – Tanvi Gundaye