हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात वैभव लक्ष्मीचे व्रत केले जाते. दर गुरूवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचे व्रत अनेक सुवासिनी करतात. या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले, असे म्हटले जाते. त्यामुळे या महिन्यात उपासना करणे शुभ मानले जाते. गुरूवारी करण्यात येणारे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी- नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या कुटूंबात धन-धान्य, समृद्धी नांदण्यासाठी हे व्रत केले जाते.
यंदा 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. शास्त्रानुसार , मार्गशीर्ष महिना भगवान श्री कृष्णाला प्रिय समर्पित आहे. खरं तर, मार्गशीर्ष हे नाव श्री कृष्णाचे नाव देखील आहे. त्यामुळे असे म्हटले जाते की, सुख-शांती आणि भरभराटीसाठी मार्गशीर्ष महिन्यात काही उपाय केल्याने घरात नक्कीच फरक जाणवतो. जाणून घेऊयात, यासंदर्भातील काही सोपे उपाय,
खालील उपाय करता येतील –
- भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावे, या उपायाने सकारात्मकता सर्वत्र जाणवते.
- मार्गशीर्ष महिन्यात विष्णूसहस्त्र नाम, भागवत गीता यांचे पठण करणे शुभ मानले जाते.
- मार्गशीर्ष महिन्यात सात्विक अन्न खावे.
- याशिवाय या महिन्यात यमुना, गंगा अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते.
- अन्नदानही तुम्ही करू शकता. गाई, कावळे यांना अन्नदान करता येईल.
- मार्गशीर्ष महिन्यात दानधर्म करणे शुभ मानले जाते.
- मार्गशीर्ष महिन्यात चुकून्ही सूडबुद्धिच्या गोष्टी करू नयेत.
या महिन्यातील पुढील मंत्राचा जप करावा –
ओम कृष्णाय नम:
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे
मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार –
पहिला गुरूवार – 5 डिसेंबर
दुसरा गुरूवार – 12 डिसेंबर
तिसरा गुरूवार – 19 डिसेंबर
चौथा गुरूवार – 26 डिसेंबर
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde