Sunday, April 14, 2024
घरमानिनीमुलींचे लग्न करण्यासाठी योग्य वय काय असावे?

मुलींचे लग्न करण्यासाठी योग्य वय काय असावे?

Subscribe

चंदा मांडवकर :

लग्नाचा प्रश्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी उभा राहतोच. खासकरुन सध्याचे धावपळीचे आयुष्य आणि करियर मध्ये असलेली स्पर्धा पाहता हा प्रश्न आणखीच महत्वाचा बनला आहे की, मुलींचे लग्न करण्यासाठी योग्य वय नक्की किती असावे? वर्षानुवर्ष परंपरागत चालत आलेल्या रितीनुसार मुलींचे लग्न करण्याचे योग्य २० ते २५ वर्ष असल्याचे मानले जाते. परंतु बदलत्या विचारसणीमुळे काही लोक हेच वय २५ ते ३० वर्ष असावे असे म्हणतात. या व्यतिरिक्त काही लोक आता ३२ ते ३५ व्या वयात ही लग्न करतात. खरंतर २० ते ३० वर्षाच्या वयात प्रत्येकजण हा आपले करियरमध्ये यश मिळवण्याचे मागे धावत असतो. त्यामुळे लग्नाबद्दल विचार करणे दूरच राहते.

- Advertisement -

लग्न न करणे हा सुद्धा एखाद्याचा व्यक्तीगत निर्णय असू शकतो. मात्र भारतात १८ वर्षाची मुलगी आणि २१ वर्षाच्या मुलाचे लग्न कायदेशीर मानले जाते. त्यांना लग्न करण्याचा अधिकार असतो. पण आजकाल प्रत्येकजण लग्नापूर्वी आपले आयुष्य स्थिर करण्यास पाहत असतो. त्यामुळेच लग्न करण्याचे वय ही वाढले जाते.

7 Rituals That Every Marathi Bride Holds Close To Her Heart

- Advertisement -

खरंतर नव्या पीढीनुसार विचार केल्यास भारतात सध्याच्या मुलींना लग्न करण्याबद्दल विचारले तर ते वयाच्या पंशवीनंतर किंवा तिशीत लग्न करु इच्छितात. परंतु भारतात असे ही आहे की, योग्य वेळी आणि वयात मुलीचे लग्न न झाल्यास लोक तिच्याबद्दल काही गोष्टी बोलू लागतात. आपण बऱ्याच वेळा आपल्या घरी पाहतो जेव्हा एखादे नातेवाईक येतात आणि आपली मुलगी मोठी झाली असेल तर तिच्या लग्नाचा विषय तर ते जरुर काढतात. त्यामुळे काही वेळेस मुलींना आपल्या लग्नाचे दडपण येऊ लागते.

मुलींना आपले लग्न आणि करियर या दोन गोष्टींचा योग्य निर्णय घेणे फार महत्वाचे वाटते. त्यामुळे भारतात जरी मुलींचे लग्न करण्याचे वय १८ असले, तरीही एका महिलेच्या रुपात जबाबदाऱ्या स्विकारण्यास ती किती सक्षम आहे हे सुद्धा घरातील मंडळींनी पाहिले पाहिजे. त्याचसोबत आपली मुलगी शारिरीक, मानसिक रुपात लग्न केल्यानंतर काही गोष्टी व्यवस्थितीत सांभाळू शकते का? याबद्दल ही पालकांनी जाणून घेतले पाहिजे. अन्यथा लग्न करण्याचे योग्य वय जरी असेल आणि तिला तो निर्णय आता घ्यायचा नसेल तर यामुळे वाद ही निर्माण होऊ शकतात.

Maharashtrian Wedding | Wikinow

दुसऱ्या बाजूला काही लोकांचे असे ही म्हणणे असते की, मुलीच्या लग्नासाठी उशिर केल्यास तिला पुढील काही गोष्टींमध्ये समस्या येऊ शकतात. खासकरुन प्रग्नेंसीसाठी. मात्र सध्याच्या तरुणाईचे लग्नाबद्दलचे मतं विचारल्यास ते काही जण लग्नाऐवजी लिव्ह-इन-रिलेशनशिपचा सुद्धा निर्णय घेतात. बड्या शहरांच्या ठिकाणी या गोष्टी पहायला मिळतात. पण गावाकडच्या ठिकाणी तर मुलींचे वय एका १८ झाले की, तिच्या लग्नासाठी मूलगा शोधण्यास घरातील मंडळी धावपळ करु लागतात. अशावेळी प्रत्येकानेच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, मुलीचे लग्न तर होईलच पण ती करियर आणि खासगी आयुष्य संतुलित आहे का हे सुद्धा पहावे. त्यानुसारच प्रत्येक मुलीने, तिच्या पालकांनी आपल्या परिस्थितीनुसार तिच्या लग्नाचा विचार जरुर केला पाहिजे.

मुलींचे लग्न करण्याचे वय कधी-कधी बदलले गेलेयं?

आपल्यातील फार कमी लोकांना माहिती असेल की, १९७८ मध्ये मुलींचे लग्न करण्याचे वय हे १५ वर्ष आणि मुलाचे १८ वर्ष होते. त्यानंतर १९७८ मध्ये पुन्हा लग्नाच्या वयासंबंधित संशोधन होत त्यात मुलींचे लग्न करण्याचे वय १८ वर्ष आणि मुलाचे २१ वर्ष केले गेले. तर भारतीय संविधानानुसार आपल्याला समानतेचा हक्क आपल्याला दिल्याने आता मुलीचे आणि मुलाचे लग्न करण्याचे कमीत कमी वय २१ वर्ष असावे लागते.

 


हेही वाचा :

महिलांनी वाढत्या वयासह कराव्यात ‘या’ टेस्ट

- Advertisment -

Manini