Prepare time: 10min
Cook: 15 min
Ready in: 20 min
Ingredients
- तांदूळ - कमीत कमी 2 वाटी
- कांदा 1
- टोमॅटो 1
- बटाटा 1
- मटार - अर्धा कप
- गोडा मसाला
- लाल तिखट
- धणे पूड
- पाणी
- हळद
Directions
- सर्वात आधी कांदा. टोमॅटो, बटाटा बारीक चिरून घ्या. तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.
- कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या.तेल गरम झाले की, कांदा, टोमॅटो, बटाटा परतून घ्यावा.
- भाज्या मऊसुत होण्यास सुरूवात झाल्यावर त्यात गोडा मसाला,लाल तिखट, हळद, धणे पूड, चवीपूरते मीठ घालून परतून घ्या.
- सर्व मसाले शिजत आले की, त्यात तांदळू घाला आणि गरजेनुसार पाणी घाला.
- मसाल्यावर 1 चमचा तूप घाला आणि कुकरचे झाकण लावून घ्या.
- कुकरच्या किमान 2 शिट्या करून घ्या.
- तुमचा झटपट तयार होणारा मसाले भात आता तयार झाला आहे.