Prepare time: 15 min
Cook: 15 min
Ready in: 30 min
Ingredients
- मटार - 1 ते 2 कप
- रवा - अर्धी वाटी
- तांदळाचे पीठ - पाव वाटी
- लसणाच्या पाकळ्या - 5 ते 6
- हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- कडीपत्ता
- आल्याचा छोटा तुकडा
- पाणी
- मीठ
- तेल
Directions
- सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात मटार घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या , कडीपत्ता, आलं आणि पाणी मिक्स करून घ्या.
- सर्व जिन्नस एकत्रित वाटून घ्यावेत.
- तयार बॅटरमध्ये बारीक रवा, तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालण्यास विसरू नये.
- आपण घावण्यासाठी जसे बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे बनवून घ्यावे
- यानंतर पॅन गरम करून त्यावर तेल सोडावे. चमच्याने हळूवारपणे बॅटर तव्यावर सोडावे.
- धिरड्यांच्या चारही बाजूने तेल सोडून व्यवस्थित शिजवून घ्यावे.
- तुमचे गरमा गरम मटारचे धिरडे तयार झाले आहे. तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.