Friday, January 24, 2025
HomeमानिनीReligiousDreaming Signs : स्वप्नात या गोष्टी पाहणे शुभ

Dreaming Signs : स्वप्नात या गोष्टी पाहणे शुभ

Subscribe

स्वप्न म्हणजे एखाद्याला गुलाबी विश्वात नेणारी अथवा एखाद्याला झोपेतून जागी करणारी गोष्ट आहे. काहीवेळा आपल्या स्वप्नात अशा घटना दिसतात, ज्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या नसतात. अनेक स्वप्न तर अशी असतात जी आपण झोपेतून उठल्यावर आपल्या लक्षातही नसतात. ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्नांचा अर्थ सुद्धा असतो. अनेक स्वप्ने भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात. काही गोष्टी स्वप्नात पाहणे शुभ मानले जाते.

मंदिर पाहणे –

अनेकवेळा आपल्याला स्वप्नात एखादे मंदिर पाहतो. स्वप्नात मंदिर पाहणे शुभ असते. स्वप्नात मंदिर पाहिल्याचा अर्थ होतो की, तुम्हाला लवकरच देवाचे दर्शन दिसणार आहे आणि तुमची अडलेली कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.

इंटरव्यू देणे –

स्वप्नात इंटरव्यू देणे आयुष्यात होणाऱ्या चांगल्या घटनांचा इशारा समजतो जातो. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला नोकरी मिळू शकते किंवा नोकरीत तुमचे प्रमोशन होऊ शकते.

आंघोळ करताना पाहणे –

जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला आंघोळ करताना पाहत असाल तर तुमच्यासाठी हे शुभ संकेत असू शकतात. असे पाहणे म्हणजे लवकरच पैसा तुमच्याकडे येणार आहे आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

लहान मुल हसताना पाहणे –

स्वप्नात हसताना पाहणे म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रगती करणार आहात, असा समजला जातो. याव्यतिरीक्त तुमच्या घरी लहान बाळ येऊ शकते, असा सुद्धा म्हटले जाते.

पाण्याने भरलेले भांडे –

स्वप्नात पाण्याने भरलेले भांडे पाहणे म्हणजे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. पाण्याने भरलेले भांडे पाहिल्याने तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो.

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini