Prepare time: 10 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- तांदूळ - 1 कप
- मेथी - 1 कप
- टोमॅटो - कांदा - प्रत्येकी 1
- हिरवी मिरची - 1
- हळद
- गरम मसाला
- लाल लिखट
- तेल
- मीठ
- कोथिंबीर
Directions
- सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत आणि काही वेळासाठी पाण्यात भिजत ठेवावेत.
- मेथीची भाजी बारीक कापून घ्यावी.
- कुकरमध्ये तेल टाका. तेल गरम झाले की, त्यात खडे मसाले घालावेत.
- यानंतर कांदा, टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यावे.
- कांदा, टोमॅटो मऊसूत झाल्यावर लाल तिखट , हळद टाकून घ्यावी.
- चवीनूसार मीठ घालावे. आता मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तांदूळ घालावे.
- बारीक चिरलेली कोथिंबीर घालायला विसरू नका.
- गरजेनुसार पाणी घालावे आणि कुकरला 4 ते 5 शिट्या आणाव्यात.
- तुमचा झटपट तयार होणारा मेथी पुलाव तयार झाला आहे.