हिंदू शास्त्रात वास्तूशास्त्राला खूप जास्त महत्त्व आहे. असे म्हणतात की, वास्तूशास्त्रातील नियमांप्रमाणे सर्व गोष्टी केल्यास घरात सकारात्मक परिणाम दिसतात. शास्त्रात घरात आरसा ठेवण्यासंबधी काही नियम सांगण्यात आले आहेत. असे म्हणतात की, वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा लावल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते. याचबरोबर घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जेचा वावर वाढतो. त्यामुळे जाणून घेऊयात, आरसा घरात कुठे ठेवू नये.
आरसा आपले प्रतिबिंब आपल्याला दाखवतो. याशिवाय आपले व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी आपण कसे दिसतो या सर्व गोष्टी आपल्याला आरश्यामुळे दिसतात. त्यामुळे काचेचा वापर हा योग्यरित्या होणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार, चुकीच्या ठिकाणी आरसा ठेवल्याने घरात नकारात्मक परिणाम दिसू लागतात.
स्टोअररूम –
घरातील स्टोअर रुममध्ये चुकूनही आरसा ठेवू नये. असे केल्याने घरात कलह वाढतो आणि ताणतणाव निर्माण होतो. याशिवाय घरातील सकारात्मक उर्जा कमी होते.
बेडरूम –
बेडरूममधील आरश्याजवळ कधीही आरसा लावू नये. असेल तर रात्री झाकून ठेवायला हवे.
स्वयंपाकघर –
शास्त्रातील नियमांनुसार, स्वयंपाकघरात आरसा लावू नये. स्वयंपाकघरात आरसा लावल्याने अन्नावर नकारात्मक परिणाम दिसू लागतो. याशिवाय आरसा देखील खराब होतो, कारण काचेवर तेल आणि मसाले चिकटतात.
कुठे लावाल आरसा –
- घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेला आरसा ठेवणे शुभ असते. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते.
- महिला आपल्या पर्समध्ये आरसा ठेवू शकतात.
- पुजेच्या ठिकाणी आरसा ठेवणे शुभ असते.
- कपाटातील लॉकरमध्ये आरसा ठेवणे शुभ असते. असे म्हणतात की, यामुळे संपत्तीत वाढ होते.
- घरात औषधे जिथे ठेवता तिथे चुकूनही आरसा ठेवू नये. असे म्हणतात की, औषधांजवळ आरसा ठेवल्याने औषधांमध्ये वाढ होते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde