Tuesday, February 11, 2025
HomeमानिनीRecipeModak Curry Recipe : मोदकाची आमटी रेसिपी

Modak Curry Recipe : मोदकाची आमटी रेसिपी

Subscribe
Prepare time: 10 min
Cook: 40 min
Ready in: 50 min

Ingredients

  • बेसनाचे पीठ - 3 ते 4 वाट्या
  • गव्हाचे पीठ - 1 टीस्पून
  • हळद- 1/4 टीस्पून
  • लालतिखट - आवश्यकतेनुसार
  • मीठ - चवीनुसार
  • गरम मसाला - 1/4 टीस्पून
  • कारळे - 2 चमचे
  • तीळ - अर्धा टीस्पून
  • खसखस- अर्धा टीस्पून
  • किसलेलं खोबरं- आवश्यकतेनुसार
  • चिरलेली कोथिंबीर - आवडीनुसार
  • लसूण पाकळ्या - 6 ते 8
  • उभा चिरलेला कांदा - 1 मध्यम आकाराचा
  • आले - अर्धा इंच

Directions

  1. बेसन पीठ, गव्हाचे पीठ हळद, पाव चमचा तिखट हे सगळं एकत्र करून कणीक भिजवून घ्या. कणीक मऊ करून घ्यायला हवी. जास्त पाणी वापरु नये. तेलाचा हात लावून आता हे कणिक झाकून ठेवावे,
  2. तवा गरम करून त्यामध्ये सारणासाठी लागणारं तीळ-खसखस- चार ते पाच चमचे खोबरं-कारळे एक एक करून मिनिटभर भाजून घ्यावे. नंतर ते ताटात काढून घ्यावे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.
  3. आता तव्यात अर्धा चमचा तेलात कांदा,लसूण आणि एक-दोन खोबरं सोनेरी रंग येइपर्यंत परतून घ्यावं.
  4. आता भाजलेले खोबरे-तीळ-कारळे-खसखस त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर,हळद,तिखट,मीठ टाकून फक्त एकदाच मिक्सरमधून फिरवून घ्यावं.
  5. सारणाचा मसाला जर जास्त बारीक झाला तर चांगला लागत नाही. हे मिश्रण ओबडधोबड असलं की मस्त चव येते. आता त्यात चमचाभर तेलाचं मोहन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं.
  6. भिजलेल्या कणकेचे एकसारखे गोळे करून घ्यावेत. जास्त जाड आणि पातळ नाही असा अंदाज घेत पारी लाटून घ्यावी.
  7. आता आपण जे सारण केले आहे ते एक एक चमचा पारीमध्ये टाकून त्याचे मोदक तयार करून घ्यावेत. आता भाजलेला कांदा त्यात तिखट, हळद आणि मीठ घालून दोन चमचे पाणी टाकून वाटण करून घ्यावं.
  8. कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात तयार केलेलं कांद्याच वाटण टाकून चार पाच मिनिटे तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यावं.त्यात गरम केलेलं पाणी घालून दोन तीन मिनिटे मोठ्या गॅसवर उकळी काढून घ्यावी आणि तयार केलेले मोदक उकळीमध्ये सोडावेत.
  9. आता दोन मिनिटांनी गॅस मध्यम आचेवर ठेवून मोदकात भरून उरलेला मसाला आमटीत टाकावा आणि आता दहा मिनिटं आमटी आणि मोदक झाकण न ठेवता शिजू द्यावं. मध्ये मध्ये दोन तीनदा मोदक हलवून घ्यावेत म्हणजे सगळ्या बाजूंनी छान शिजले जातील.
  10. साधारण दहा मिनिटांनी तळाला असलेले मोदक शिजल्यामुळे वर येतील म्हणजे समजायचं की आमटी तयार आहे.
  11. आमटीला वापरलेल्या वाटणामुळे आणि मसाल्यामुळे आमटी घट्ट बनते. त्यामुळे पाणी नेहमीपेक्षा थोडं जास्त वापरावं. अशाप्रकारे मोदकाची आमटी तयार आहे,

Manini