पावसाळ्यात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांची प्रतिकारशक्ती, त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे त्यांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न अनेक महिलांना पडते. त्यातही ज्या नुकत्याच आई झाल्या आहेत त्यांना लहान बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते.
पावसाळ्यात लहान मुलांना बाहेर हवेशीर जागेवर घेऊन जाणे टाळावे.
कारण पावसाळ्यात अनेक आजार लगेच संक्रमित होतात. .
बाळाचे कपडे वेळीच बदलावे.
बाळाच्या अंगावर खूप वेळ ओले कपडे ठेवू नये.
त्यामुळे त्यांना खोकला ताप येऊ शकतो.
तसेच बाळाचे डायपर देखील वेळच्यावेळी बदलावे.
ओले डायपर अधिककाळ ठेवल्याने बाळांना त्रास होवू शकतो त्वचेला सूज, खाज येऊ शकते.
बाळांसाठी जास्त केमिकलयुक्त प्रोडट्स वापरू नये.
बाळांची त्वचा खूप संवेदनशील असते त्यामुळे त्याना केमिकलयुक्त प्रोडट्सने त्वचेचे आजार होऊ शकतात.
बाळांना सिंथेटिक कपडे घालू नये.
त्यामुळे त्यांना अधिक घाम येतो.
बाळाला मच्छरदाणीत झोपवावे.
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव असतो.
त्यामुळे शिशुंना याचा त्रास होऊ शकतो.