Prepare time: 15 min
Cook: 15 min
Ready in: 30 min
Ingredients
- मशरूम - 2 ते 3 कप
- सिमला मिरची - 1/2 कप
- चिरलेला कांदा - 1/2 कप
- दही - 3 चमचे
- बेसन - 2 चमचे
- आले-लसूण पेस्ट - 1 चमचा
- लाल तिखट
- हळद
- चाट मसाला
- तेल
- लिंबाचा रस
- मीठ
Directions
- मशरूम स्वच्छ करून मध्यभागी कापून घ्यावेत.
- एका भांड्यात दही, बेसन, लाल तिखट, हळद, चाट मसाला एकजीव करून घ्यावे.
- कढईत तेल गरम करण्यास ठेवावे.
- तेल गरम झाले की, आले-लसूणची पेस्ट सोनेरी रंगाची होईपर्यत परतवून घ्यावेत.
- यानंतर तेलात चिरलेला कांदा, सिमला मिरची परतवून घ्यावेत.
- मिश्रणात मशरूमचे काप टाकावेत आणि मशरूममधील पाण्याची वाफ होईपर्यत परतावेत.
- यानंतर दह्याचे मिश्रण मशरूममध्ये मिक्स करून घ्यावेत.
- सर्वात शेवटी लिंबाचा रस आणि चवीपूरते मीठ टाकावे.
- चटपटीत स्नॅक्स रेसिपी मशरूम टिक्का तयार झाला आहे.