Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 200 ग्रॅम मशरूम
- 2 कप दही
- 1 चमचा आले-लसूण पेस्ट
- 1 चमचा लाल तिखट
- 2 चमचे हळद
- 1 चमचा गरम मसाला
- 1 चमचा जिरं पावडर
- 1चमचा धणे पावडर
- 1 चमचा कसूरी मेथी
- 1 चमचा लिंबाचा रस
- 1 चमचा तेल
- मीठ चवीनुसार
- ग्रेव्हीसाठी:
- 2 चमचा तेल
- 1 चमचा बटर
- 1 चमचा जिरं
- 1 कांदा (चिरून)
- 1 चमचा आले-लसूण पेस्ट
- 2 टोमॅटो (प्युरी करून)
- 2 चमचे हळद
- 1 चमचा लाल तिखट
- 1 चमचा धणे पावडर
- 1 चमचा जिरं पावडर
- 2 चमचा गरम मसाला
- 1 चमचा कसूरी मेथी
- 2 कप काजू पेस्ट
- 2 फ्रेश क्रीम
- चवीनुसार मीठ
- कोथिंबीर (सजावटीसाठी)
Directions
- आधी मशरूम स्वच्छ धुवून घ्या.
- आता एका मोठ्या भांड्यामध्ये दही, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, धणे पावडर, जिरं पावडर, गरम मसाला, कसूरी मेथी, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र मिसळा.
- त्यामध्ये स्वच्छ धुतलेले मशरूम घाला आणि चांगले मिक्स करा.
- 15-2० मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवा.
- नंतर तव्यावर थोडेसे तेल टाकून मशरूम फ्राय करून घ्या.
- ग्रेव्ही तयार करण्यासाठी
- एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये बटर गरम करून त्यामध्ये जिरं घाला.
- चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
- नंतर आले-लसूण पेस्ट घाला.
- टोमॅटो प्युरी घालून 5-7 मिनिटे शिजवा.
- नंतर हळद, तिखट, धणे पावडर, जिरं पावडर, कसूरी मेथी आणि मीठ घालून मिक्स करून घ्या. काजू पेस्ट घालून 2-3मिनिटे शिजवा.नंतर दूध किंवा क्रीम घालून ग्रेव्ही चांगली उकळू द्या.तयार केलेले मशरूम टिक्का ग्रेव्हीत घाला आणि 5 मिनिटे शिजवा.
- वरून थोडीशी कोथिंबीर घालून सजवा.अशाप्रकारे मशरूम टिक्का मसाला तयार आहे याचा आस्वाद तुम्ही नान किंवा पराठासह घेऊ शकता.