हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्रात, घरात सुख-शांती नांदण्यासाठी, व्यक्तीची प्रगती होण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. शास्त्रात सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन केल्यास आयुष्यातील अडीअडचणी नक्कीच कमी होऊ शकतात आणि घराची परिस्थितीही बदलते. यापैंकी एक म्हणजे काही वस्तू चुकूनही घरात रिकाम्या ठेवू नयेत. घरात या वस्तू जर रिकाम्या ठेवल्या तर वास्तूदोषाला कारण ठरू शकतात. त्यामुळे जाणून घेऊयात, कोणत्या वस्तू घरात ठेवून रिकाम्या ठेवू नयेत.
किचन कंटेनर –
घरातील किचन कंटेनर कधीही रिकामे ठेवू नयेत, असे करणे अशुभ समजले जाते. रिकामे कंटेनर घरातील सकारात्मक ऊर्जा थांबवण्याचे काम करते. त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी किचनमधील धान्यांचे कंटेनर रिकामे ठेवू नयेत.
पर्स –
तुमचे पर्स किंवा पाकिट रिकामे ठेवू नयेत. रिकाम्या पाकिटामुळे पैसा अडला जातो. ज्यामुळे आर्थिक समस्या सुरू होतात.
बाथरुममधील बादली –
बाथरुममधील रिकामी बादली वास्तूदोषाचे कारण बनू शकते, कारण वास्तूशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे बाथरुममधील बादली रिकामी ठेवू नये.
पाण्याचे भांडे –
वास्तूशास्त्रानुसार, घरात पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. शास्त्रात पाण्याला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते, त्यामुळे असे मानण्यात येते की, रिकामे भांडे लक्ष्मीची कृपा तुमच्यापासून हिरावून घेते.
तिजोरी –
रिकाम्या तिजोरीने आर्थिक चणीचणी सुरू होतात. त्यामुळे थोडीतरी रक्कम तिजोरीत कायम ठेवावी. यासोबत तुम्ही तिजोरीत गोमती चक्र, शंखही ठेवू शकता. यामुळे प्रगतीतील अडचणी दूर होतात आणि देवी लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न राहते.
देवघरातील पाण्याचे भांडे –
शास्त्रानुसार, देवघरातील पाण्याचे भांडे रिकामे ठेवू नयेत. पूजा केल्यानंतर भांडे पाण्याने भरावे अथवा तुम्ही थोडे गंगाजल शिंपडू शकता. असे म्हणतात की, असे भरलेले पाण्याचे भांडे देवाची तहान भागवते. ज्यामुळे देवी-देवतांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde