लांबसडक, मऊ, दाट केस प्रत्येक महिलेला हवे असतात. पण, बदलत्या लाइफस्टाइलनुसार, आरोग्यासह केसांच्या आरोग्यही बिघडत आहे. केसांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. यात केसगळती, कोंडा, केस पांढरे होणे सारख्या तक्रारी जाणवतात. अशावेळी घरातील मोठी मंडळी केसांना तेल लावण्याचा सल्ला देतात. त्यामुळे घाईघाईत बरेचजण केस धुतल्यावर ओल्या केसांनाच तेल लावतात. पण, असे करणे खरंच योग्य आहे का? केसांच्या आरोग्यासाठी ओल्या केसांना तेल लावणे कितपत फायदेशीर असते, पाहूयात,
ओल्या केसांना तेल लावणे योग्य आहे का?
खरं तर, ओल्या केसांना तेल लावणे चुकीचे आहे. ओल्या केसांना तेल लावल्याने केसांना फायदा होण्याऐवजी नुकसान होते.
ओल्या केसांना तेल लावण्याचे तोटे –
- ओल्या केसांना तेल लावल्याने स्काल्पवर तेल जमा राहते. ज्यामुळे केसांच्या मुळांमध्ये अडथळे निर्माण होतात. परिणामी, केसगळती सुरू होते.
- ओल्या केसांना तेल लावल्याने स्काल्पवर ओलावा वाढतो. ज्यामुळे स्काल्पवर बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतात.
- ओल्या केसांना तेल लावल्याने केस जास्त चिकट होतात. केस चिकट झाल्याने केस धुण्यास त्रास होतो.
केसांना तेल कधी लावायचे ?
केस धुतल्यानंतर लगेचच केसांना तेल लावू नये. केस पूर्णपणे सुकल्यानंतरच केसांना तेल लावणे योग्य समजले जाते. याशिवाय केस धुण्याच्या आदल्या रात्री केसांना तेल लावावे. रात्री तेल लावल्याने रात्रभर पोषण मिळते.
केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत –
- केसांना चापून तेल लावू नये. यासाठी हातावर केसांना पुरेल इतकेच तेल घ्यावे. खूप जास्त तेल केसांना लावल्याने केस चिकट होतात.
- तेल लावल्यानंतर मसाज करावा. मसाज केल्याने केसांच्या मुळांपर्यत पोहोचते आणि केस मजबूत होतात.
- आठवड्यातून किमान दोन वेळा केसांना तेल लावावे. या सवयीमुळे केसांना वेळेवर पोषण मिळते आणि केस निरोगी राहतात.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde