घरातील फर्निचर घराची शोभा वाढवते. घर सुंदर, आकर्षक दिसावे यासाठी कोणी बाजारातील फर्निचर घरी आणते तर कोणी स्वत: डिझाइन करून फर्निचर बनवून घेतं. काही तर खिशाला परवडत नसल्याने वापरलेले, जुनं फर्निचर विकत घेतं. असे म्हणतात की, फर्निचर केवळ घराची शोभा वाढवत नाही तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव सुद्धा देते. वास्तूशास्त्रातही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे. विशेष करून जेव्हा तुम्ही वापरलेले अर्थात जुनं फर्निचर घरी आणता. वास्तुशास्त्रानुसार जुन्या फर्निचरमुळे घरात नकारात्मक परिणाम सुरू होतात. यामुळे कुटूंबातील सुसंवाद, आरोग्य आणि समृद्धीवर नकारात्मकतेचा प्रभाव वाढतो. तुम्हालाही सतत जुनं फर्निचर विकत घेण्याची सवय असल्यास ही बातमी संपूर्ण वाचावी.
जुन्या फर्निचरचा परिणाम –
- जुन्या फर्निचरमुळे घरात अशांतता निर्माण होते.
- कुटूंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता वाढते.
- जुन्या फर्निचरमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा साठलेली असू शकते. जर यात नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला आर्थिक समस्या सुरू होऊ शकतात.
- वारंवार घरात आजारपण येत असेल तर यामागे घरातील जुनं फर्निचर हे कारण असू शकते.
- आधी ज्या ठिकाणी हे फर्निचर असेल त्याठिकाणी जर सतत नकारात्मकता असेल तर तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेत हे अडथळा आणू शकते, ज्यामुळे घरातील शांती भंग होऊ शकते.
- जुन्या फर्निचरमध्ये बॅक्टेरिया, धूळ, किटक असू शकतात. अशा परिस्थितीत, जुनं फर्निचर स्वच्छ न करता घरी आणल्यास तुमचे घर अस्वच्छ होऊ शकते.
- बॅक्टेरिया, धूळ, किटकांमुळे आरोग्याच्या समस्या सुरू होऊ शकतात.
हेही पाहा –